Maharashtra New CM Oath Ceremony LIVE : एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
Eknath Shinde Oath ceremony Live Updates :भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आज शपथविधी घेणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
LIVE

Background
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक झाली. राज्यातील खरीप हंगाम, पाऊस-पाणी आणि पीकविमा याबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.
नारायण राणेंचं ट्विट
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अराजकतेला लगाम बसेल व राज्य पुन्हा प्रगतिपथावर अग्रेसर होईल ही खात्री आहे, असे ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेय.
Eknath Shinde : नव्या मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांचे नितीन गडकरींकडून अभिनंदन
देशाचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या नव्याने समोर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं अभिनंदर केलं आहे. त्यांनी अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट करत अभिनंदन केलं असून 'पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुम्हा दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीचे नवे उच्चांक प्रस्थापित करो,' असं ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल श्री @mieknathshinde जी यांचे तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल श्री @Dev_Fadnavis जी यांचे हार्दिक अभिनंदन व दोघांनाही यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 30, 2022
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर गडकरींनी केलं अभिनंदन

महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज