एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्रातील पाऊस आणि धरणांची सद्यस्थिती
मुंबई: गेल्या 11 दिवसात राज्यभरात सर्वदूर पावसानं दमदार हजेरी लावल्याचं चित्र आहे. यामुळं कागदावर तरी महाराष्ट्र हिरवा दिसतोय. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यभरातील 297 तालुक्यात 1 जुलै ते 11 जुलैच्या दरम्यान 100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
यात संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागाचा समावेश आहे. तर 24 तालुके असे आहे कि जिथं सरासरी इतका किंवा सरासरीच्या 75 टक्के पाऊस झाला आहे.
राज्यातील फक्त 32 तालुक्यात सरासरीच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा कमी पाऊस झाल्याचं चित्र आहे. मराठवाड्यातील काही तालुके आणि नंदुरबार जिल्ह्यातील 2 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळं राज्याच्या धरणातील एकूण पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राज्यातील धरणात आतापर्यंत 26 टक्के पाणी साठा जमा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. मात्र ही परिस्थिती उद्यापासून बदलण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेनं उद्यापासून राज्यात पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यभरात 2576 लहानमोठी धरणं आहेत. त्यामध्ये सध्या 26 % पाणीसाठा उपलब्ध आहे.
मुंबई परिसरातील धरणांची सद्यस्थिती
धरण - पाणीसाठा
*मोडकसागर - 47 %
* तानसा - 52 %
* विहार - 46 %
*तुळशी - 100 %
*बारवी - 41%
*भातसा - 56 %
पुणे परिसराती मोठ्या धरणांची सद्यस्थिती
* खडकवासला - 91 %
* भाटघर - 39 %
*वरसगांव - 33 %
* डिंभे - 25 %
*नीरा देवधर - 40 %
* मुळशी - 49 %
सातारा * कोयना - 34 %
सांगली - *वारणा - 41 %
कोल्हापूर -
*दूधगंगा - 27 %
*राधानगरी - 60 %
सोलापूर-
भीमा - उजनी - 0 %
अहमदनगर
*भंडारदरा - 44 %
*मुळा - 29 %
* निळवंडे - 23 %
नाशिक -
*गंगापूर - 55 %
*गिरणा - 0%
*उर्ध्व वैतरणा - 48 %
जळगाव -
*हतनूर - 25 %
अमरावती
*उर्ध्व वर्धा - 46%
यवतमाळ
बेंबळा - 34 %
नागपूर
*पेच तोतलाडोह - 32 %
भंडारा
*गोसीखुर्द - 67 %
*इटियाडोह - 22 %
मराठवाडा
औरंगाबाद - जायकवाडी - 0%
परभणी- पूर्णा येलदरी - 0%
परभणी - निम्न दुधणा - 14%
बीड- माजलगाव - 0 %
नांदेड
उर्ध्व पेणगंगा - 4%
विष्णूपुरी - 75 %
उस्मानाबाद - सिना कोळेगाव - 0%
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement