(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 550 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 324 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाच्या संख्येत (Maharashtra Corona Update) दिवसेंदवस वाढ होताना दिसत आहे. गेली तीन दिवस राज्यात नव्याने आढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या देखील पाचशेपार आहे. रविवारी राज्यात 550 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 324 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
राज्यात आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,35,008 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.09 टक्के इतके झाले आहे.
राज्यात 2997 सक्रिय रुग्णांची नोंद
राज्यात आज एकूण 2997 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 2070 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये 354 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, सक्रिय रुग्णांमध्ये वाढ
देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 828 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार देशात नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढली असून सक्रिय रुग्णांच्या संख्येतही भर पडली आहे. आधीच्या दिवशी 2658 नवी कोरोनाबाधित रुग्ण आणि 33 रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या 24 तासांत झालेल्या 14 रुग्णांच्या मृत्यूंसह देशातील कोरोना बळींची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 586 रुग्णांचा मृत्यू झालाा आहे. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही 17 हजारांवर पोहोचली आहे. सध्या देशात 17 हजार 87 रुग्णांवर पोहोचली आहे. आदल्या दिवशी हा आकडा 16 हजारांवर होता. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 035 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासह देशात आतापर्यंत कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 26 लाख 11 हजार 370 वर पोहोचली आहे.