एक्स्प्लोर

Mask : बंदिस्त ठिकाणी जात असाल तर मास्क घालाच; टास्क फोर्स सदस्य नेमकं काय म्हणाले? 

Maharashtra Coronavirus Cases : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना राज्यात मास्कची सक्ती पुन्हा होऊ शकते का यावर टास्क फोर्सच्या सदस्यांनी संवाद साधला आहे. 

मुंबई: उत्तर भारतात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना राज्यातही रुग्णसंख्या वाढणार का? कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता कितपत आहे? असे प्रश्न नागरिकांना पडले असताना तज्ज्ञांनी त्यावर काही दिलासादायक उत्तरं दिली आहेत. आपल्याला कोरोना व्हायरस सोबत जगावं लागेल, आपलं दैनंदिनी काम करावं लागेल, त्यामुळे कुठेही घाबरून जायचं किंवा किंवा पॅनिक व्हायचं कारण नाही असं मत राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केलं आहे. बंदिस्त ठिकाणी जात असाल तर मास्क घालाच असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

काय म्हणालेत डॉ. राहुल पंडित? 
आता आपल्याला कळून चुकलं आहे की कोरोना कुठेही गेलेला नाही. चौथी लाट येईल, येणार नाही.., रुग्ण संख्या वाढेल, कमी होईल.., ते काही जरी झालं तरी आपण काही नियम पाळले तर आपल्या जीवनात काही अडथळा येणार नाही. 

उत्तर भारतात कोरोना रुग्णसंख्या वाढती याचं नेमकं कारण काय?
कोरोनाची ही सायकल आहे. दर तीन-चार महिन्यानंतर या कोरोना केसेस कमी-जास्त होत राहतात. दुसरं कारण म्हणजे कोरोना रुग्ण संख्या कमी झाली की आपण फारसे नियम पाळत नाही. लसीकरण सुद्धा कमी प्रमाणात होतं. आता मास्क सुद्धा ऐच्छिक केले आहे.

येत्या काही दिवसात मुंबईत महाराष्ट्रामध्येसुद्धा कोरोना रुग्ण संख्या वाढू शकते?
हे सांगणं कठीण आहे. पण आपण योग्य खबरदारी घेतली तर केसेस जास्त काही वाढणार नाहीत. 

मास्क आणि जिनोम सिक्वेसिंग किती महत्वाची?
हे दोन खऱ्या अर्थाने महत्त्वाचे पिलर आहेत. बऱ्यापैकी चांगला मेडिकल डेटा समोर आला आहे. बंदिस्त जागेमध्ये मास्क घालणे गरजेचे आहे. तिथे कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात होऊ शकतो. ओपन जागेसाठी त्या परिसरात फारशी गरज नाहीये. 

मॉल्स रुग्णालय सिनेमागृह नाट्यगृह अशा ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन आम्ही करू. जिनोम सिक्वेसिंग करणे सुद्धा महत्वाचे आहे. ज्याने आपल्याला नवीन स्ट्रेन आल्यास कळेल. त्याचा प्रादुर्भाव सुद्धा तातडीने कळेल आणि त्यानुसार उपाययोजना करता येतील, आणि तो सुरुवातीलाच कळणे गरजेचे आहे

मास्क ऐच्छिक केलेला राज्याचा निर्णय बदलला जाऊ शकतो का बंदिस्त ठिकाणी मास्क अनिवार्य होऊ शकतो का?
हा पूर्णपणे राज्य सरकारचा निर्णय असेल. मात्र मास्क सक्ती पुन्हा होणार का?  या पेक्षा एक चांगली सवय म्हणून तुम्ही जर बंदिस्त जागी जात असाल तर मास्क वापरा आणि आपल्या सोबत स्वतःच्या सहकाऱ्यांचा सुद्धा कोरोनापासून बचाव करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full PC : दिल्लीत जरा आराम मिळतो... अजित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHADevendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्यMahayuti Goverment : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह युतीचे नेते राजभवनात, सत्ता स्थापनेचा दावाDevendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Embed widget