
Maharashtra Corona Cases : कोरोना उतरणीला...! बुधवारी राज्यात 51,457 रुग्ण बरे होऊन घरी, तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान
Maharashtra Corona Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

Maharashtra Corona Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 4978937 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.06% एवढे झाले आहे.
राज्यात आज 594 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 31874364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5467537 (17.15 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3059095 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 23828 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 401695 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा डोस घ्यावा, NEGVAC च्या नव्या गाईडलाईन्स
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज पुन्हा घट
मुंबईत आज 1350 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4,565 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत 29 हजार 643 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईचा डबलिंग रेट हा आता 269 दिवसांवर गेला आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर गेले आहे.
पुण्यात रुग्णसंख्येत होणारी घट कायम
पुणे शहरात आज नव्याने 1164 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 62 हजार 172 इतकी झाली आहे. शहरातील २ हजार ४०७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ३९ हजार ०९७ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात १० हजार ८०६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २३ लाख ९२ हजार ०९८ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या १५ हजार २३२ रुग्णांपैकी १,३४८ रुग्ण गंभीर तर ४,७५४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
