(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajesh Tope on Mucormycosis : म्युकरमायकोसिसनं राज्यात 90 मृत्यू, पैसे आम्ही देऊ पण केंद्रानं 'अम्फोटेरिसिन बी' द्यावं : राजेश टोपे
म्युकरमायकोसिसनं राज्यात 90 मृत्यू झाले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या रोगावरील 'अम्फोटेरिसिन बी' इंजेक्शन जास्त द्यावं अशी मागणी टोपेंनी केली आहे. पैसे आम्ही देऊ पण केंद्रानं 'अम्फोटेरिसिन बी' औषध पुरवावं, असं ते म्हणाले.
मुंबई : म्युकरमायकोसिसनं राज्यात 90 मृत्यू झाले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या रोगावरील 'अम्फोटेरिसिन बी' इंजेक्शन जास्त द्यावं अशी मागणी टोपेंनी केली आहे. पैसे आम्ही देऊ पण केंद्रानं 'अम्फोटेरिसिन बी' औषध पुरवावं, असं ते म्हणाले.
टोपे म्हणाले की, काळी बुरशीमुळे राज्यात एकूण 1500 रुग्ण आहेत. साधारण 500 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात 800 ते 850 रुग्ण उपचार घेत आहेत. यासाठी जे इंजेक्शन लागतं त्यासाठी केंद्राने आज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना ऑर्डर दिली आहे. 1 लाख 90 हजार ऑर्डर दिली आहे. पण या कंपन्या देत नाहीयेत. केंद्राने याच्यावर पण नियंत्रण केलं आहे. महाराष्ट्रात 'अम्फोटेरिसिन बी' इंजेक्शन जास्त द्यावं. हे इंजेक्शन देणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. आता 16 हजार इंजेक्शन प्राप्त झाले आहेत पण ते पुरेसे नाहीत.
टोपे म्हणाले की, याबाबत ग्लोबल टेंडर काढलं आहे. पण अजून उपलब्धता नाही. 31 मे नंतर कंपन्या सप्लाय करू शकतील. आपण महाराष्ट्रात हे इंजेक्शन बनवण्याची तयारी करत आहोत. हे प्रयत्न सुरू आहेत. शासन याला लागणारा जो खर्च आहे तो देणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून यावरील उपचारांचा खर्च मिळणार आहे.
म्युकरमायकोसिसवर उपचारासाठी एक पेशंटला 100 व्हाईल्स लागतात. आज 1500 पेशंट आहेत. आठवड्याला 200 रुग्ण वाढू शकतात. एकाला 100 इंजेक्शन लागत असतील तर दीड दोन लाख इंजेक्शन हवेत पण केंद्र आपल्याला तेवढे इंजेक्शन देत नाही. केंद्र म्हणतं त्याच्याकडे पण इंजेक्शन उपलब्ध नाही. रेमडेसिवीरची आता अडचण नाही. पण म्युकरमायकोसिसवर प्रभावी ठरणाऱ्या 'अम्फोटेरिसिन बी' बाबत मात्र अडचण आहे. यावर केंद्राने मदत करावी, असं टोपे म्हणाले.
राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात आज 4 लाख 19 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात सगळ्या राज्यात ग्रोथ रेटमध्ये महाराष्ट्र 34व्या नंबरवर आहे. दर दशलक्ष अडीच लाख चाचण्या आहेत. लसीकरणात महाराष्ट्र 2 कोटी 2 लाख 31 हजार झालं आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र एक नंबरचे राज्य आहे, असं टोपे यांनी सांगितलं.
टोपे यांनी सांगितलं की, राज्यात सध्या कोविशिल्डच्या 3 लाख तर कोवॅक्सिनच्या 2 लाख लशी उपलब्ध आहेत. या पाच लाखपैकी दुसरा डोससाठी वापरणार आहोत. आपण लसी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आपण ग्लोबल टेंडर काढले आहे. 5 कोटी लसींचं ग्लोबल टेंडर काढले आहे. हे टेंडर 25 तारखेपर्यंत ओपन ठेवले आहे.