एक्स्प्लोर

Rishabh Pant : रिषभ पंतला मँचेस्टर कसोटीत खेळवू नका, रवी शास्त्री यांचा सल्ला, शुभमन गिल समोर नवा पेच?

Rishabh Pant : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मँचेस्टर कसोटीत रिषभ पंतला संघात घेऊ नये, असा सल्ला दिला आहे.

मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया पिछाडीवर आहे. लीडस आणि लॉर्डस कसोटीत इंग्लंडनं भारतावर विजय मिळवत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारतानं बर्मिंघम कसोटीत विजय मिळवला होता. आता मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथी कसोटी खेळवली जाणार आहे. ही कसोटी 23 जुलैपासून सुरु होणार आहे. या कसोटीत उपकर्णधार रिषभ पंत खेळणार की नाही याबाबत संशय कायम आहे. रिषभ पंत या मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये असल्यानं भारताला तो न खेळल्यास मोठा धक्का ठरु शकतो. मात्र, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रिषभ पंतला चौथ्या म्हणजेच मँचेस्टर कसोटीत खेळवू नये असा सल्ला दिला आहे. 

रिषभ पंत लॉर्डस कसोटीत दुखापतग्रस्त झाला होता. इंग्लंडच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहचा बॉल कलेक्ट करण्याच्या प्रयत्नात असताना बॉल उजव्या हाताच्या बोटाला लागलानं ते दुखापत ग्रस्त झालं होतं.  यानंतर रिषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेलनं विकेटकीपिंग केलं. तर, फलंदाजी रिषभ पंतनं केलं. रिषभ पंतनं लॉर्डस कसोटीत दोन्ही डावात फलंदाजी केली मात्र दुखापतीचा परिणाम दिसून आला होता. त्यामुळं रिषभ पंत मँचेस्टर कसोटीत खेळणार की नाही याबाबत चर्चा सुरु आहेत.  

भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रिषभ पंतसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. शास्त्री यांनी भारतीय संघ व्यवस्थापन आणि शुभमन गिलला एक सल्ला दिला आहे तो म्हणजे रिषभ पंतला चौथ्या कसोटीत संघाबाहेर ठेवावं. रिषभ पंतला पूर्णपणे फिट झाल्यानंतर मैदानावर उतरवलं पाहिजे. स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून रिषभ पंतला संघात स्थान देणं देखील धोकादायक ठरु शकतं असं शास्त्री म्हणाले. 

रवी शास्त्री यांनी ICC रिव्यूमध्ये संजना गणेशन सोबत बोलताना म्हटलं की जर रिषभ पंत याचं बोट तुटलं आहे किंवा फ्रॅक्चर असेल तर रिषभ पंतला विश्रांती देणं योग्य असेल. आता इंग्लंडला रिषभ पंत दुखापतग्रस्त असल्याचं माहिती असल्यानं भारताला सब्स्टीट्यूट मिळणार नाही. जर रिषभ पंतला संघात स्थान दिल्यास त्याना विकेटकीपिंग आणि फलंदाजी करावी लागेल. फिटेनस पूर्ण नसताना कोणतंही एक काम करणं बरोबर नाही, असं शास्त्री म्हणाले. 

रिषभ पंत विकेटकीपिंग करु शकत नसेल तर त्याला फलंदाज म्हणून संधी देऊ नये. जर त्यानं विकेटकीपिंग केलं नाही तर त्याला फील्डिंग करावी लागेल. त्यावेळी ग्लोव्ज नसल्यानं पुन्हा दुखापत झाल्यास परिस्थिती खराब होऊ शकते. विकेटकीपिंग करताना संरक्षण असतं. फील्डिंग करताना ते संरक्षण नसतं,त्यामुळं धोका वाढू शकतो, अशी भीती रवी शास्त्री यांनी व्यक्तकेली. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Team India Coaching Staff : टीम इंडियाला पराभवाचे धक्के; आता गंभीरचे दोन सहकारी साथ सोडण्याच्या वाटेवर, नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाला पराभवाचे धक्के; आता गंभीरचे दोन सहकारी साथ सोडण्याच्या वाटेवर, नेमकं काय घडतंय?
Ind vs Eng 5th T20 : संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT... सूर्यांश शेडगेचं पदार्पण? इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT... सूर्यांश शेडगेचं पदार्पण? इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
IND VS ENG 5th T20 : वैभव सूर्यवंशीसह 3 खेळाडू OUT? इंग्लंडविरुद्ध शेवटच्या टी-20 सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing XI
वैभव सूर्यवंशीसह 3 खेळाडू OUT? इंग्लंडविरुद्ध शेवटच्या टी-20 सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing XI
IND VS ENG 5th T20 : भारत-इंग्लंड शेवटच्या अन् पाचव्या टी-20 मॅचची वेळ बदलली; रात्री 10 वाजता नाही, तर... कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या A टू Z
भारत-इंग्लंड शेवटच्या अन् पाचव्या टी-20 मॅचची वेळ बदलली; रात्री 10 वाजता नाही, तर... कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Panvel Crime News : ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
Embed widget