(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccination : लसीकरण न झालेल्या प्रवाशांना 500 रुपये तर दुकानदार, खासगी वाहतूकदारांना 10 हजारांचा दंड लागणार
Corona Vaccination : राज्य सरकारने लसीकरणासंबंधी कडक धोरण घेतलं असून लसीकरण न झालेल्यांना 500 रुपयांपासून ते 10 हजारांपर्यंत दंड लावण्यात येणार आहे.
मुंबई : राज्यात लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असला तरी अद्यापही अनेकजण निष्काळजीपण वागत असून त्यांनी लस घेतली नसल्याचं समोर येत आहे. त्यावर आता राज्य सरकारने कडक भूमिका घेतली असून दंडाच्या रक्कमेत आता वाढ करण्यात आली आहे. यामध्ये प्रवाशांना 500 रुपये तर सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
राज्य सरकारने आता लसीकरण संदर्भात कडक धोरण जाहीर केलं आहे. नविन नियमावलीमध्ये दंडाची रक्कम वाढवली असून कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना लसीकरण पुर्ण झालेलं असावं अशी सक्ती केली आहे. तसेच दुकानं मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृह, सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी प्रवेश देताना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाली असणं बंधनकारक आहे.
500 रुपयांपासून 10 हजारांपर्यंत दंड
लसीकरण न केलेल्या प्रवाशांना 500 रुपये दंड करण्यात येणार आहे तर विना लसीकरण प्रवास करत असल्यास वाहक किंवा चालक यांना 500 रुपये दंड करण्यात येणार आहे. तर खाजगी वाहक कंपनी मालकला 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. राज्यातील दुकानदार, मॉल्स आणि खाजगी वाहतूक यांनी जर नियमांचा भंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत 100 टक्के पहिल्या डोसचे नियोजन
राज्यातील लसीकरणावर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, "राज्यात रोज जवळपास पाच लाख लोकांचे लसीकरण होत आहे. या नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत किंवा त्या पुढच्या दहा दिवसांमध्ये राज्यातील 100 लोकांना लसीचा पहिला डोस मिळेल याचे नियोजन करण्यात आलं आहे."
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये 11 ते 20 वयोगटातील मुलांना कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे त्यांचं लसीकरण व्हावे यासाठी राज्य सरकार केंद्राकडे आग्रह धरला आहे.
संबंधित बातम्या :
- New Covid-19 Variant : नव्या व्हेरियंटचा धोका, बाधित देशातून भारतात येण्याजाण्यावर बंदी? पंतप्रधानांनी बोलवली उच्चस्तरीय बैठक
- केंद्राकडे लहान मुलांच्या लसीकरणासाठी आग्रही, 30 नोव्हेंबरपर्यंत पहिला डोस 100 टक्के पूर्ण करण्याचं नियोजन: राजेश टोपे
- Mumbai Vaccine : मुंबईत 100 टक्के नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस, आता पूर्ण लसीकरणाचं ध्येय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha