New Covid-19 Variant : नव्या व्हेरियंटचा धोका, बाधित देशातून भारतात येण्याजाण्यावर बंदी? पंतप्रधानांनी बोलवली उच्चस्तरीय बैठक
New Covid-19 Variantv : नवीन व्हेरिएंट आणि त्यापासून होणारा धोका पाहाता डीजीसीएची आज बैठक होणार आहे.
New Covid-19 Variant : दक्षिण अफ्रीकेत आढळलेल्या नवीन कोरोना व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा भितीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालेय. नव्या व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेय. हा धोका लक्षात घेता अमेरिकासह अनेक देशांनी प्रवासावरील निर्बंध वाढवले आहेत. याबाबत भारत सरकारही निर्णय घेणार असल्याचं वृत्त आहे. आज शनिवारी डीजीसीए याबाबत एक बैठक घेणार आहे. यामध्ये नवीन व्हेरिएंट आढललेल्या देशातून येणाऱ्या विमानप्रवासावर निर्बंध अथवा या देशातून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवसांचं क्वारंटायन बंधनकारक करण्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली बैठक -
दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचं भय वाढत चाललेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता दिल्लीत उच्चस्तरीय बैठक होणार आहे. डेल्टापेक्षाही जास्त भयंकर हा विषाणू मानला जात असल्याने तातडीने उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
डीजीसीए आज घेऊ शकतं निर्णय :
नवीन व्हेरिएंट आढळलेल्या दक्षिण आफ्रिका, युरोप, हाँगकाँगवरुन भारतात फ्लाइट येत आहेत. याबाबत डीजीसीए आज बैठक घेणार आहे. या बैठकीत विमानप्रवासावर बंधनं अथवा येथून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवसांचं क्वारंटाइन बंधनकारक करण्यात येऊ शकतं, असं सांगण्यात येत आह. सुत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या वृत्तनुसार, डीजीसीएनं आज महत्वाची बैठक बोलवली आहे.
या देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध –
नवीन कोरोना व्हेरिएंटमुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशात प्रवासावर बंधन लावण्यात आली आह. अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकामधून येणाऱ्या विमानप्रवासावर बंधन लावली आहेत. यामध्ये इटली, ऑस्ट्रिया, फ्रांस, जापान, यूनाइटेड किंगडम, सिंगापुर, नेदरलँड, माल्टा, मलेशिया, मोरक्को, फिलीपींस, दुबई, जॉर्डन, अमेरिका, कनाडा आणि तुर्की या देशांचा समावेश आहे. याबाबत भारतात आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.
लसवंतामध्ये आढळला नवीन व्हेरिएंट -
लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांमध्येही नवीन कोरोना व्हेरिएंट आढळला आहे. त्यामुळे जगभरात चिंतेचं आणि भितीचं वातावरण निर्माण झालेय. आधीच युरोपमधील परिस्थितीने जगाची चिंता वाढवली होती. त्यात दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेल्या नवीन व्हेरिएंटने भर टाकली आहे. लसवंत असलेल्या लोकांमध्येही कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळला आहे. त्यातच संशोधकांनी हा नवीन व्हेरिएंट म्युटेट होऊ शकतो, आणि अधिक वेगानं प्रसारीत कऱण्याची क्षमता असल्याचेही सांगितलेय.
अमेरिकेनं लावले निर्बंध –
America Travel Ban : नवीन कोरोना व्हेरिएंटचा धोका ओळखून अमेरिकेनं दक्षिण आफ्रिकासह अन्य सात आफ्रिकन देशांवर सोमवारपासून प्रवासाचे निर्बंध लावले आहेत. अमेरिकेनं प्रत्येक प्रवाशाला निगेटिव्ह चाचणी दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे.