Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात आज 407 नवीन कोरोना रूग्ण; तर दोन बाधितांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : आज राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या फार वाढली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे.
Maharashtra Corona Update : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना (Covid-19) महामारीचे संकट आहे. यातून आता थोडाफार दिलासा मिळाला असला तरी यातून अजून पूर्ण मुक्तता झालेली नाही. अद्याप देखील कोरोनाचे रूग्ण रोज सापडत आहेत. आजची परिस्थिती काहीशी चिंताजनक आहे. राज्यात आज 407 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर दोन कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या परिस्थितीत आज रूग्णांची संख्या फार वाढली आहे. काल राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या 180 वर होती. आज हा आकडा 407 वर पोहोचला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे.
राज्यातील आज 429 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 79,71,775 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.14% एवढे झाले आहे. रूग्ण बरे होण्याचा आकडा जरी दिलासादायक असला तरी मात्र, कालच्या तुलनेत आजची कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे.
सक्रिय रूग्ण (Maharashtra Corona Update)
राज्यातील रूग्ण संख्या घटत आहे. त्याचबरोबर सक्रिय रूग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे. राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या तीन हजारांच्या खाली आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या 2715 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यात सध्या 797 करोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. तर पुण्यापाठोपाठ मुंबईत 784 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत.
सध्या सगळीकडे सणासुदीचे दिवस आहेत. या निमित्ताने अनेक नातेवाईक, मित्र-मंडळींशी भेटणं साहजिकच आहे. मात्र, सण समारंभ जरी असले तरी मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा, घरी स्वच्छता राखा. आपला चेहरा आणि नाक यांना, विशेषत: न धुतलेल्या आणि सॅनिटाइझ न केलेल्या हातांनी विनाकारण स्पर्श करू नका यांसारख्या काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या :