Maharashtra Corona : राज्यात कोणत्या जिल्ह्यात निर्बंध कायम, कोणत्या जिल्ह्यात दिलासा? जिल्ह्यानिहाय पॉझिटिव्हिटी दर
Maharashtra Corona : राज्यातील काही जिल्हे सोडले तर अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहेत. अनेक जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. तर काही जिल्ह्यांत मृत्यूचा दर अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा आलेख जरी उतरणीला लागला असला, तरी शासनानं आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवारी) जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. काल कोरोनाची रुग्णसंख्या 18 हजारांवर आली आहे. मात्र पहिल्या लाटेतील ही संख्या सर्वोच्च होती. शहरातील कोरोना आटोक्यात आला असला तरी ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणं गरजेचं आहे. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन बेडची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार, 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. पॉझिटीव्हीटी जास्त असलेल्या जिल्ह्यातून निर्बंध शिथिल असलेल्या जिल्ह्यात येण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी 29 मे 2021 च्या तारखेनुसार, आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता गृहीत धरली जाणार आहे.
राज्यातील काही जिल्हे सोडले तर अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहेत. अनेक जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. तर काही जिल्ह्यांत मृत्यूचा दर अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा आलेख जरी उतरणीला लागला असला, तरी शासनानं आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम सारखेच असणार नाहीत. जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता याच्या आकडेवारीवरुन त्या जिल्ह्यात नियम शिथील करायचे की, आणखी कडक करायचे हे ठरवलं जाणार आहे. तसेच ज्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या जिल्ह्यांच्या बॅार्डर सील करण्यात येणार आहेत. तसेच या जिल्ह्यांमध्ये कडक लॅाकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे.
जाणून घेऊया राज्यातील जिल्ह्यानिहाय पॉझिटिव्हिटी दर काय?
- मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर 11.27 टक्क्यांवर आहे, तर सध्या मुंबईत 27,322 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.
- पुण्यात झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीसी घट झाली असली तरी पुण्याचा पॉझिटिव्हिटी दर 9.93 टक्के इतका आहे.
- नाशिकमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर 8.11 टक्के आहे.
- औरंगाबाद जिल्ह्यात 219 रुग्ण असून त्यापैकी शहरात 62 आणि ग्रामीणमध्ये 167 रुग्ण आहेत. तसेच औरंगाबादचा पॉझिटिव्हिटी दर 3.70 इतका आहे.
- बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं दिसून येत असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 9.43 इतका आहे.
- सोलापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 8.90 टक्के इतका आहे.
- बुलढाणा जिल्ह्याच्या सरासरी पॉझिटिव्हिटी दर 14.76 टक्के इतका आहे.
- पालघर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 16.78 इतका आहे. तर पालघर ग्रामीण जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 14.75 इतका आहे (वसई विरार मनपा वगळून)
- नांदेड जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत असून 30 मे पर्यंतचा पॉझिटिव्हिटी दर 7.06 टक्के इतका आहे.
- सांगली जिल्हाचा पॉझिटिव्हीटी रेट 17 टक्के आहे.
- परभणी जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर हा 8.5% आहे.
- हिंगोली सरासरी 7% एवढा पॉझिटिव्हिटी दर आहे.
- अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असून 30 मे पर्यंतचा पॉझिटिव्हिटी दर 17.32 % इतका आहे.
- रायगड जिल्ह्यात आज एकूण 6903 अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून एकूण पॉझिटिव्हिटी दर हा 5 टक्क्यांवर आहे.
- वाशिम जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर अंदाजे 6 टक्के इतका आहे.
- रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 17.69 टक्के इतका आहे.
- नंदुरबार जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर 4 टक्क्यांवर पोहोचला आहे.
पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे आणि पालिकांसाठी :
- ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (12 मे 2021 ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.
- सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येतील.
- सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र, आवश्यक
- गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.
- अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.
- दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.
- कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.
- कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते
पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे आणि पालिकांसाठी :
- ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे 12 मे 2021 ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील
- अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड
- प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.
- उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी 12 मे 2021 चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.
- दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान
- कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच 12 मेच्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरुच राहतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :