गलिच्छ राजकारण करणाऱ्या नवाब मलिकांना आवरा! चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीरच्या मुद्यावरून केंद्र सरकार राजकारण करत आहे, असा आरोप केला आहे. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नवाब मलिकांनी काय म्हटलं?
राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, महाराष्ट्र सरकारनं रेमडेसिवीरसाठी 16 कंपन्यांना सांगितलं होतं. तेव्हा आम्हाला कंपन्यांकडून सांगण्यात आलं की केंद्र सरकारने त्यांना महाराष्ट्रात औषध न पुरवण्यास सांगितले आहे. या कंपन्यांना केंद्राकडून इशारा देण्यात आला होता की त्यांनी तसे केल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असा खळबळजनक आरोप नवाब मलिकांनी केला आहे. आपल्या देशात 16 कंपन्या आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीर निर्यात देणारी युनिट्स आहेत. त्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या 20 लाख कुपी आहेत. आता सरकारकडून निर्यातीवर बंदी घातली गेली आहे. त्यामुळं ही औषधं आता आपल्या देशात विकायला परवानगी देणं गरजेचं आहे, पण केंद्र सरकार त्यास नकार देत आहे, असं मलिकांनी म्हटलं आहे.
It is sad & shocking that when Government of Maharashtra asked the 16 export companies for #Remdesivir, we were told that Central Government has asked them not to supply the medicine to #Maharashtra.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 17, 2021
These companies were warned, if they did, their license will be cancelled(1/2)