विदर्भात होणाऱ्या कोरोनाच्या उद्रेकामागे नवीन स्ट्रेन आहे का?
अमरावती, यवतमाळ, नागपूर अशा जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील करोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का, या संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे
यवतमाळ : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यापाठीमागे कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या रुग्णामध्ये नवrन N440k हा स्ट्रेन आढळल्याचे बोललं जातंय. तो नवीन स्ट्रेन म्हणजे नेमके काय याची माहिती यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख डॉक्टर विवेक गुजर यांनी दिली आहे.
हा नवा स्ट्रेन आहे का?
यवतमाळचा स्ट्रेन हा यवतमाळसाठी जरी नवीन असला, तरी देशासाठी नाही. ह्या म्युटेशनला N440K असे म्हणतात. हा दक्षिण भारतात बराच आढळला आहे. आंध्र प्रदेशच्या 37% लोकांना ह्या स्ट्रेनचेच इन्फेक्शन आहे.
हा इंग्लंडमध्ये आढळलेला स्ट्रेन आहे का? हा इंग्लंडमध्ये आढळलेला स्ट्रेन नाही.
हा कसा आढळला? हा युके वाला आहे का हे टेस्ट करायला म्हणून सर्व जिल्यातून सँपल्स पाठवले होते. त्यात हा आढळून आला. जी एकदम कोविड रुग्णांची लाट अकोला, अमरावती, यवतमाळ येथे दिसू लागली, त्या पार्शवभूमीवर ह्या टेस्ट्स सांगितल्या होत्या. सर्वांनीच जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवावे असे आदेश आरोग्य संचालक ह्यांनी सर्व जिल्ह्यांना दिले होते. प्रत्येक जिल्ल्यातून 75 नमुने पाठवण्यात आले आहेत. राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाला पुणे येथे.
हा नमुना कोणाचा? हा यवतमाळचा रुग्ण 29 जानेवारीला भरती झाला होता. ह्याची युकेची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही.
काय बदल आहे ह्या नवीन स्ट्रेन मध्ये? आपल्याकडे आतापर्यंत असलेल्या स्ट्रेन आणि ह्या स्ट्रेनमध्ये पूर्ण बदल नसून फक्त एकाच जीनचा बदल झाला आहे, तो बदल व्हायरसच्या आर जी प्रोटीनमधला आहे.
ह्या स्ट्रेनचे काही वेगळे परिणाम आहेत का? ह्या स्ट्रेनमुळे खूप काही वेगळे होत नाही. ह्याचा वाढण्याचा वेग खूप झपाट्याचा आहे. आधीच्या स्ट्रेनच्या तुलनेत असेही नाही. सामान्यतः हा बदलला असला तरी परिणाम आता असणाऱ्या व्हायरससारखाच आहे.
ह्यावर काय ट्रीटमेंट घ्यावी लागेल? तीच औषधे, तीच लस आणि तीच काळजी गरजेची आहे.
अकोल्याचे नमुने आजच तपासणीसाठी पुण्याला पोहचले आहेत. त्यामुळे काही म्युटेशन असल्याची अजून माहिती नाही. अमरावती येथेही म्यूटेटेड व्हायरसचा कुठलाही रुग्ण आढळलेला नाही.
जर काही वेगळे पाठवलेल्या सँपल्समध्ये आढळले तर नव्या गाईडलाइन्स दिल्या जातील. अकोल्यातील आरोग्य उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण आणि अमरावतीतून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम ह्यांची ही माहिती आहे.
अमरावती, यवतमाळमध्ये करोना विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही : आरोग्य विभाग आतापर्यंत अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही. पुण्यातील 12 नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत. या अनुषंगाने अधिक तपासणी सुरू असून अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आणखी काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, पुणे या ठिकाणी जनुकीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे.