एक्स्प्लोर

दिलासादायक...! राज्यातील 27 जिल्ह्यांसह 23 मनपा क्षेत्रांमध्ये काल कोरोनामुळं एकही मृत्यू नाही

Maharashtra Corona Update: काल बुधवारी महाराष्ट्रातील तब्बल 27 जिल्हे आणि 23 महापालिका क्षेत्रांमध्ये कोरोनामुळं एकही मृत्यू झाला नसल्याचं सरकारी आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे.

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत असल्याचं दिसत आहे. काल बुधवारी महाराष्ट्रातील तब्बल 27 जिल्हे आणि 23 महापालिका क्षेत्रांमध्ये कोरोनामुळं एकही मृत्यू झाला नसल्याचं सरकारी आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. मुंबई उपनगरातील ठाणे जिल्ह्यासह सात उपनगरांमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. तर नाशिक मंडळातील अहमदनगर जिल्ह्यात दोन आणि नाशिक शहरात दोन मृत्यू वगळता इतर जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. विदर्भातील एकाही जिल्ह्यात काल कोरोनामुळं कुणालाही जीव गमावावा लागलेला नाही. राज्यात काल 1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल एकूण 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक 4 मृत्यू हे सातारा जिल्ह्यात झाले असल्याची नोंद आहे. 

या जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही

ठाणे (Thane)
ठाणे मनपा (TMC)
कल्याण डोंबवली मनपा (KDMC)
उल्हासनगर मनपा (Ulhasnagar)
भिवंडी निजामपूर मनपा (Bhiwandi)
मीरा भाईंदर मनपा (Mira Bhaindar)
पालघर (Palghar)
रायगड (Raigad)
पनवेल मनपा (Panvel)
नाशिक (Nashik)
मालेगाव मनपा (Malegaon)
अहमदनगर मनपा (ahemdnagar)
धुळे (Dhule)
धुळे मनपा (Dhule Municipal corporation)
जळगाव (Jalgaon)
जळगाव मनपा (Jalgaon Municipal corporation) 
नंदूरबार (Nandurbar)
पुणे मनपा (PMC)
पिंपरी चिंचवड मनपा (PCMC)
सोलापूर (Solapur)
सोलापूर मनपा (Solapur Municipal Corporation)
कोल्हापूर (Kolhapur)
कोल्हापूर मनपा (Kolhapur Municipal corporation)
सांगली मिरज कुपवाड मनपा (sangli miraj kupwad corporation)
सिंधुदुर्ग (sindhurga)
औरंगाबाद (Aurangabad)
औरंगाबाद मनपा (Aurangabad Municipal corporation)
जालना (Jalna)
हिंगोली (Hingoli)
परभणी (parbhani)
परभणी मनपा (Parbhani Municipal corporation)
लातूर (Latur) 
लातूर मनपा (Latur Municipal corporation)
नांदेड (Nanded) 
नांदेड मनपा (Nanded Municipal corporation)
अकोला (Akola)
अकोला मनपा  (Akola Municipal corporation)
अमरावती (Amravati)
अमरावती मनपा  (Amravati Municipal corporation)
यवतमाळ (Yavatmal)
बुलढाणा (Buldhana)
वाशिम (Washim)
नागपूर (Nagpur)
नागपूर मनपा (Nagpur Municipal corporation)
वर्धा (Wardha)
भंडारा (Bhandara)
गोंदिया (Gondia)
चंद्रपूर (Chandrapur)
चंद्रपूर मनपा (Chandrapur Municipal corporation)
गडचिरोली (Gadchiroli)

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल 1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 2 हजार 879 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 27  हजार 426  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.43 टक्के आहे. राज्यात काल 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 7537  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  

राज्यात सध्या 25 हजार 728 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,05, 205व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1004  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 13, 70, 390 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 

मुंबईत गेल्या 24 तासात 463 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 463 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 558 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,28, 696 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.  

Coronavirus : आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट अनिवार्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget