Maharashtra Corona Update : राज्यात दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट; तर रिकव्हरी रेट 97.64 टक्क्यांवर
Coronavirus Today : राज्यात आज 34 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus Today) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 886 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 948 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 69 हजार 739 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे.
राज्यात आज 34 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 11 हजार 847 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 98, 703 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1024 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 41 , 55, 107 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
287 दिवसांनी देशात सर्वात कमी दैनंदिन रुग्णांची नोंद
देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीची घट पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात देशात 287 दिवसांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 8,865 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 197 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात 11,971 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 44 लाख 56 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 63 हजार 852 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 3 कोटी 38 लाख 61 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1.5 लाखांहून कमी झाली आहे. एकूण 1 लाख 30 हजार 793 रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.
113 कोटी लसीचे डोस
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- CoWin App : कोविन अॅपचा जगभर डंका वाजणार; 12 देशांनी केली तंत्रज्ञान हस्तांतरणाची मागणी
- कोरोना संकटात अर्थव्यवस्थेला केंद्राचा 'बुस्टर डोस'; आठ दिवसांत राज्यांना 95 हजार 82कोटींचा निधी मिळणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha