Maharashtra Corona Update : राज्यात आज 767 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर रिकव्हरी रेट 97.71 टक्क्यांवर
राज्यात आज 28 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7591 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 767 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 903 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 84 हजार 338 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे.
राज्यात आज 28 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7591 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 74 हजार 812 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 923 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 56 , 19, 951 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 97 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुण्यात गेल्या 24 तासात 97 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 93 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 5,06,796 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 828 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 5330नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
जगाला ओमिक्रॉनची धास्ती; देशात मात्र कोरोना प्रादुर्भावात घट
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळं संपूर्ण जग धास्तावलं आहे. अशातच देशात मात्र अद्याप एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती काल (मंगळवारी) राज्यसभेत बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी धोका मात्र अद्याप टळलेला नाही. ओमिक्रॉनचं संकट (Omicron) टाळण्यासाठी प्रत्येकानंच सतर्क राहण्याची गरज आहे. देशात सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात देशात जवळपास 9 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात कोरोनामुळं 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत देशांत 10 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती मिळाली आहे.