Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात गुरुवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही तर 877 नव्या कोरोनाबाधितांची भर
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 877 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 632 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 95 हजार 249 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे.
राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही
राज्यात आज आज ओमायक्रॉनचा एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 32 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 25 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 19 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 693 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 77 हजार 371 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 839 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 73 , 06, 860 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
देशात 24 तासांत 7974 नवे कोरोनाबाधित
भारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी, ओमायक्रॉननं हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 7,974 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 343 कोरोनाबाधितांनी जीव गमावला आहे. ज्यामध्ये केरळात काल (बुधवारी) कोरोनाचे 4006 आणि 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत 7,948 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Omicron : मुंबईत 35 टक्के डेल्टा तर 2 टक्के ओमायक्रॉन, जिनोम सिक्वेसिंगच्या चाचणीचे निष्कर्ष
- Corona Variant Omicron : चिंता वाढली! देशात ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव; महाराष्ट्रात सर्वाधिक 32 रुग्ण