एक्स्प्लोर

Maharashtra Congress : नाना पटोलेंना हटवा, शिवाजीराव मोघेंना महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष करा; विदर्भातील 24 नेत्यांची मागणी

Congress : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन नाना पटोलेंना (Nana Patole) हटवा आणि शिवाजीराव मोघेंना ( Shivajirao Moghe) अध्यक्ष करा अशी मागणी मोघे समर्थकांनी केलीय.

Maharashtra Congress : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन नाना पटोलेंना (Nana Patole) हटवा आणि शिवाजीराव मोघेंना ( Shivajirao Moghe) अध्यक्ष करा, अशी मागणी मोघे समर्थकांनी केली आहे. विदर्भातील 24 नेत्यांनी नाना पटोलेंना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. नाना पटोलेंनी प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजी आणली, पक्षात दलित-मुस्लिम आणि आदिवासी यांना दूर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळं पुढचा प्रदेशाध्यक्ष आदिवासी समाजातून करावा, अशी मागणी पक्षाचे निरिक्षक रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांच्याकडे करण्यात आली आहे.

नाना पटोलेंची पक्षात मनमानी, मोघे समर्थकांचा आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षात गटबाजी निर्माण केली आहे. नाना पटोले यांच्यामुळेचं काँग्रेसची मुख्य व्होटबॅंक असलेले दलित, मुस्लीम आणि आदिवासी यांना पक्षात दूर करण्यात आले आहे. नाना पटोले हे पक्षात मनमानी करत आहेत. आता काँग्रेसमध्ये देखील नानागिरी सुरू असल्याचा दावा शिवाजीराव मोघेंच्या समर्थकांनी केला आहे. नाना पटोले पक्षाच्या बैठकीत कुणाचंही ऐकत नाही असा गंभीर आरोप विदर्भातील 24 नेत्यांनी केला आहे. त्यामुळं पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवा आणि आदिवासी नेते शिवाजीराव मोघेंना प्रदेशध्यक्षपद करा, अशी मागणी पक्षाचे निरिक्षक रमेश चेन्निथला यांच्याकडे केली आहे. त्यामुळं आता रमेश चेन्निथला याबाबत काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

नाना पटोलेंना हटवण्यासाठी काही नेते हायकमांडला भेटणार

काँग्रेस समितीचे सचिव रहमान खान नायडू, सदस्य प्रदेश काँग्रेस कमिटी प्रकाश मुगदीया, सरदार महेंद्र सिंह सलूजा, इक्राम हुसैन यासोबत इतर 21 पदाधिकाऱ्यांनी रमेश चेन्निथला यांची मुंबईत भेट घेतली. नाना पटोले यांना हटवण्याची मागणी करण्यासाठी हे सर्व नेते लवकरच हायकमांडला भेटण्यासाठी रायपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात जाणार आहेत. 

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसमधील अंतर्गत वाज चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. उमेदवारी मिळाली असतानाही अर्ज न भरल्यानं सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं. तर सत्यजीत तांबे यांनी पक्षाने उमेदवारी दिलेली नसतानाही अपक्ष अर्ज भरुन एकप्रकारे बंड पुकारलं होतं. यावरुन नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरु झाली. तसेच बाळासाहेब थोरात नाराज असल्याचीही चर्चा सुरु झाली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bhandara News : बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर करणार का? नाना पटोले म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Embed widget