Maharashtra College Reopening | राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भातील नियमावली जारी!
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाविद्यालयांना त्यासंबंधीचे स्वतंत्र अधिकार देण्यात आले आहेत. महाविद्यालयांनी 30 एप्रिलपूर्वी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक प्रकल्प, अंतर्गत चाचण्या आणि अभ्यासक्रम पूर्ण करावा, असं नियोजन करण्याचेही आदेश दिले आहेत.
उस्मानाबाद : राज्यातील अकृषिक विद्यापीठांसह अभिमत, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांबरोबरच त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत . कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळला नसल्याने जागेची उपलब्धता पाहून 50 टक्के विद्यार्थ्यांना रोटेशन पध्दतीने बोलवावे, अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांना दिल्या आहेत. तर वसतिगृहात प्रवेश देताना दूरवरील विद्यार्थ्यांनाच प्राधान्य द्यावे आणि एका खोलीत एकच विद्यार्थी असावा, अशाही सूचना केल्या आहेत.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाविद्यालयांना त्यासंबंधीचे स्वतंत्र अधिकार देण्यात आले आहेत. महाविद्यालयांनी 30 एप्रिलपूर्वी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक प्रकल्प, अंतर्गत चाचण्या आणि अभ्यासक्रम पूर्ण करावा, असं नियोजन करण्याचेही आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अथवा आवारात फिरताना मास्क वापरणं बंधनकारक असेल. महाविद्यालयांमधील कॅन्टिनवर देखरेख ठेवावी, विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. वसतिगृहात विद्यार्थ्यांना राहण्यास परवानगी देण्यापूर्वी वसतिगृहाचे विद्युत लेखापरीक्षण करुन घेतले जाणार आहे. खोलीतील विद्युत साहित्य तपासून घेतले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांची माहिती संकलित करुन त्यांची स्वतंत्रपणे व्यवस्था केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन वर्गात शिकविता येईल, अशी मुभा देण्यात आली आहे.
- महाविद्यालयातील स्वच्छतागृहे, वर्गखोल्या, प्रयोगशाळा निर्जुतुकीकरण करुन घ्यावेत
- वसतिगृहाची सुविधा देताना दूरवरील विद्यार्थ्यांनाच द्यावे प्राधान्य; एका वर्गात एकच विद्यार्थी राहिल
- पालक आणि विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांसाठी मार्गदर्शक अधिकारी नियुक्त करावेत
- लेखी : प्रात्यक्षिक तासाला 30 ते 50 टक्केच विद्यार्थी असतील उपस्थित
- विद्यार्थी महाविद्यालयात तासाला सलग तीन तासांपर्यंतच उपस्थित राहिल
- प्रत्येक अभ्यासक्रमाचे वेगवेगळे वेळापत्रक असावे, जेणेकरुन विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही
- महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचे तापमान व ऑक्सिजन लेव्हल तपासावी
- महाविद्यालयातील स्वच्छतागृहे, वर्गखोल्या, प्रयोगशाळा निर्जुतुकीकरण करुन घ्यावेत
- वसतिगृहाची सुविधा देताना दूरवरील विद्यार्थ्यांनाच द्यावे प्राधान्य; एका वर्गात एकच विद्यार्थी राहिल
- पालक आणि विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांसाठी मार्गदर्शक अधिकारी नियुक्त करावेत
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला . मात्र , महाविद्यालयांना त्यासंबंधीचे स्वतंत्र अधिकार देण्यात आले आहेत . महाविद्यालयांनी 30 एप्रिलपूर्वी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक प्रकल्प , अंतर्गत चाचण्या आणि अभ्यासक्रम पूर्ण करावा, असे नियोजन करण्याचेही आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अथवा आवारात फिरताना मास्क वापरणे बंधनकारक असेल. महाविद्यालयांमधील कॅन्टिनवर देखरेख ठेवावी, विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. वसतिगृहात विद्यार्थ्यांना राहण्यास परवानगी देण्यापूर्वी वसतिगृहाचे विद्युत लेखापरीक्षण करुन घेतले जाणार आहे . खोलीतील विद्युत साहित्य तपासून घेतले जाणार आहे . ज्या विद्यार्थ्यांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची बाधा झाली होती . त्यांची माहिती संकलित करुन त्यांची स्वतंत्रपणे व्यवस्था केली जाणार आहे . विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन वर्गात शिकविता येईल , अशी मुभा देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :