College Reopen : कॉलेज कॅम्पस गजबजणार, राज्यात 1 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू
College Reopen : राज्यात 1 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार आहे. महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.
मुंबई : कोरोनामुळे राज्यातील महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्ष 1 फेब्रुवारी पासुन सुरु होणार आहे. दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.
राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्ष 1 फेब्रुवारी पासुन सुरु होणार आहे. परंतु कोविडची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापिठ आणि स्थानिक प्रशासनाला असेल ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस पुर्ण झालेले आहेत त्यांनाच प्रवेश मिळणार. 15 फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येणा-या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात तर त्यानंतर परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या किंवा ऑनलाईन याचा विचार स्थानिक पातळीवर घेण्याचा अधिकार आहे.
- राज्यातील महाविद्यालय सुरू करण्यासाठी 1 फेब्रुवारी 2022 पासून मान्यता देण्यात आलेली आहे.
- मात्र स्थानिक पातळीवरील कोविडची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासन या संदर्भात ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालय सुरू करायची की नाही याचा निर्णय घेणार
- ज्या विद्यार्थ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांनाच प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येईल.
- ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले नाहीत त्यांना उपस्थित राहता येणार नाही त्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार
- 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत ज्या महाविद्यालयांच्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात त्या नंतरच्या परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा
- कोरोनाच्या कारणास्तव ज्या विद्यार्थ्याला परीक्षा देणे शक्य नाही त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी
- महाविद्यालयातील शिक्षक किंवा कर्मचारी यांच्या उपस्थिती संदर्भात संबंधित विद्यापीठ आणि महाविद्यालयाने निर्णय घेण्याचा अधिकार आहे
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbai School Reopen : पहिल्याच दिवशी मुंबईतील 90 टक्के पेक्षा अधिक शाळा सुरू
आजपासून शाळेत पुन्हा किलबिलाट, राज्यात शाळा कुठे सुरु, कुठे बंद; वाचा सविस्तर
सोमवारपासून शाळा सुरू होत असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही : आदित्य ठाकरे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha