एक्स्प्लोर

Dussehra 2021 Melava Live :महराष्ट्रात जर लोकशाहीचा खून, तर यूपीत लोकशाहीचा मळा फुलला आहे का? : मुख्यमंत्री

Shivsena Dasara Melawa 2021 : आजच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Key Events
Maharashtra CM Dussehra Melava LIVE Updates Shiv Sena chief Uddhav Thackeray addresses supporters Dasara Melava Dussehra 2021 Melava Live :महराष्ट्रात जर लोकशाहीचा खून, तर यूपीत लोकशाहीचा मळा फुलला आहे का? : मुख्यमंत्री
संपादित फोटो

Background

मुंबई : दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा कोरोना काळात बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होणार आहे. पण, तरीही शिवसैनिकांमध्ये तोच जोश पाहायला मिळतोय. यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार? ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार? सैनिकांना मेळाव्यात नवीन उर्जा मिळाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

दसरा मेळावा शिवसैनिकांसांठी एक उर्जेचा स्रोतच जणू. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत दसरा मेळाव्याल्या शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं गर्दी करतात आणि एक नविन उर्जा घेऊन पक्षाच्या कामाला सुरुवात करतात. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला एक वेगळीच परंपरा आहे. गेली अनेक वर्ष शिवाजी पार्कच्या मैदानात ठाकरेंची तोफ धडधडायची. पण यंदा हा सोहळा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने भाषण देणाऱ्या ठाकरेंना यंदा मोजक्याच लोकांसमोर भाषण करावं लागणार आहे. पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी ॲानलाईनची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार विभागप्रमुख, महापौर आणि महापालिकेतले महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. 

आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत सैनिकांसाठी हा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर राज्यातले आणि केंद्रातले भाजपचे नेते असतील असं म्हटलं जातंय. तसेच यातील सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे, तो म्हणजे केंद्रीय यंत्रणा. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय यंत्रणा राज्यातल्या विविध नेत्यावर कारवाई सुरु आहे. ईडी, सीबीआय आणि आता एनसीबीच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आहे. अशातच शिवसेना महाविकास आघाडीसोबत जरी असली तरी सावरकरांना भारतरत्न देण्याची त्यांची आजही आग्रही मागणी राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेचं सावरकर प्रेम अजुनही कमी झालेलं नाही. त्यामुळं नव्यानं सावरकरामुळे सुरु झालेल्या वादावर उद्धव ठाकरे खरपूस समाचार घेतील.लखीमपूर प्रकरणात केंद्र सरकारचा चिडीचूपपणा, महाराष्ट्र बंद शेतकरीविरोधी धोरणं यावर उद्धव ठाकरे आवर्जुन बोलणार राज्यातल्या शेतकरी धोरणं जाहीर करतील. कोरोना काळात मुंबई महाराष्ट्र वगळता ॲाक्सिजन आणि लसीवरून जे राजकारण रंगलं त्यावरून उद्धव ठाकरे जाहिरपणे बऱ्याचवेळा बोलले, पण आगामी निवडणुकांच्या पाश्वर्भूमिवर राज्यात काय काय केलं? हे सांगायला ठाकरे विसरणार नाहीत. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावं भगतसिंग कोश्यारी मंजूर करत नाहीत. तसेच विविध धोरणात राज्यपाल आणि सरकारमध्ये एकमत नसतानाचे बरेच किस्से आहेत. त्यामुळे ठाकरे राज्यपालांचाही समाचार घ्यायला विसरणार नाहीत.  

19:38 PM (IST)  •  15 Oct 2021

मुंबईत लष्कराचं संग्रहालय उभं करणार - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विकृतपणा, मुंबईत लष्कराचं संग्रहालय उभं करणार, चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रात आणायचा प्रयत्न, सीमेवरील वातावरणाप्रमाणे संग्रहालयात वातावरण उभं करणार - उद्धव ठाकरे

19:31 PM (IST)  •  15 Oct 2021

महाराष्ट्रातच ड्रग्ज सापडत आहेत असं नाही, मग महाराष्ट्राशी नतद्रष्टपणा का? - उद्धव ठाकरे

गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरही ड्रग्ज सापडले त्यावर का नाही बोलत, महाराष्ट्रातच ड्रग्ज सापडत आहेत असं नाही, मग महाराष्ट्राशी नतद्रष्टपणा का? मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर गुजरातला सर्वाधिक निधी, महाराष्ट्र मात्र जनतेच्या पैशाने कोरोनाची लढाई लढतोय - उद्धव ठाकरे

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
Embed widget