ठरलं...? अर्थ खातं दादांकडेच, सहकार वळसे पाटलांना, तर भुजबळांना अन्न आणि औषध पुरवठा खातं
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांकडील सर्वात मोठं खातं अखेर अजित पवारांकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती. अर्थ खातं अजित पवारांनाच दिलं जाणार.
Maharashtra Cabinet Portfolios Allotment: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडील सर्वात मोठं खात अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं (Finance Ministry) देण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. महायुतीत नव्यानं दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (Nationalist Congress Party) अर्थ खात्यासोबतच सहकार खातंही मिळण्याची शक्यता आहे. सहकार खातं (Cooperation Ministry) दिलीप वळसे पाटलांकडे आणि छगन भुजबळांकडे अन्न आणि औषध पुरवठा खातं सोपवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थ खात्यासह सहकार खात्यासाठीही आग्रही असल्याचं बोललं जात होतं. अखेर अर्थ खात्यासोबतच सहकार खातंही राष्ट्रवादीकडेच जाणार असल्याचं बोलंल जात होतं. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे सर्वात महत्त्वाची समजली जाणारी अर्थ आणि गृह अशी दोन्ही खाती होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील अर्थ खातं अजित पवारांकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे.
महिला आणि बाल विकास मंत्रालय, युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Politics: आधी शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांसोबत बैठक, मग फडणवीसांसोबत अर्धा तास चर्चा, अन् मध्यरात्री अचानक मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेनं रवाना, पुन्हा नवा ट्वीस्ट?
- Maharashtra NCP Political Crisis: उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थखातं देण्यावर शिक्कामोर्तब, सहकार खातंही मिळण्याची शक्यता, खातेवाटप दोन दिवसांत?