Maharashtra Cabinet Expansion : अद्याप मंत्रीमंडळ विस्तार का नाही? नेमकी कुणाला घाई?
Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कशामुळे रखडला आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कशामुळे रखडला आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. आमची माहिती आहे की शिंदे गटातल्या 50 पैकी 40 आमदारांना मंत्री व्हायचे आहे म्हणून विस्तार रखडला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही घाई नाही. त्यांचा मंत्रीमंडळ विस्ताराचा मध्य प्रदेश, बिहार आणि कर्नाटक पॅटर्न पाहिला तर हे लक्षात येते.
काय झालं? शिंदे भाजपा सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार का होत नाही? याबाबात अनेक तर्क आहेत. एक ॲागस्टला सर्वोच्च न्यायालयात काय होते? त्यानंतर विस्तार होईल. मंत्रीमंडळाचा अंतिम निर्णय अमित शहा घेणार आहेत, परंतु अमित शहा यांच्यासोबत शिंदे यांची चर्चाच झालेली नाही. भाजपकडे स्वतःचे आणि अपक्ष असे 115 आमदार आहेत. शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत. शिंदेंसोबत आलेल्या मोठ्या नेत्यांना मंत्री करावेच लागेल. त्याच प्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार करताना एकनाथ शिंदेंना प्रादेशिक समतोल बघावा लागेल. असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
खरं कारण आहे 50 पैकी 40 आमदार मंत्री पदासाठी इच्छुक आहेत. दहा नाहीत तेच कोण हेच शोधावे लागेल. आलेल्या पैकी कोणालाही शिंदेंनी मंत्री करतो असे अश्वासन दिलेले नव्हते. परंतु आशावादी सगळेच आहेच. मंत्रीपद न मिळाल्याने शिवसेनेतून शिंदेंसोबत आलेल्यापैकी चारपेक्षा अधिक आमदार नाराज झाले तर शिंदे गटाचे अस्तिस्व संपेल. कारण पक्षांतरबंदी संदर्भातला 2/3 चा निकष पूर्ण होणार नाही.
मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने भाजपाच्या राज्यातल्या नेत्यांमध्ये अस्वस्था असू शकेल. केंद्रीय नेतृत्वाला तशी काही घाई नाही. कारण, मोदी-शहांचा मंत्रीमंडळ विस्ताराचे पॅटर्न तेच सांगतात. त्याबाबत जाणून घेऊयात.
1) मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वातले काँग्रेस सरकार 20 मार्च 2020 रोजी कोसळले. त्यानंतर 23 मार्चला शिवराजसिंह चौहाण मुख्यमंत्री झाले. त्यानंतर तब्बल महिनाभराने केवळ पाच जणांचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला. पुढचा विस्तारसाठी तर 100 दिवसाचा कालावधी लागला.
2) कर्नाटकमध्ये जेडीयु-काँग्रेस सरकारचा 17 जणांनी पाठींबा काढला. परिणामी सरकार कोसळले. 26 जुलै 2019 ला येडीयुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 22 दिवस एकट्या येडुरप्पांचे मंत्रीमंडळ होते. तिथेही पूर्ण विस्तार व्हायला सहा महिने लागले होते.
3) नितीश कुमार यांनाही 40 ते 45 दिवस वाट पहावी लागली होती. लालू प्रसाद यांच्या सोबतची सत्ता सोडून नितीश कुमार भाजपासोबत आले. दोन महिने 36 पैकी नितीश कुमार यांच्यासह केवळ 14 आमदार मंत्री होते. त्यात भाजपाचे सात होते. त्यातले भाजपाचे दोन उपमुख्यंमंत्री होते. प्रत्येक मंत्र्यांकडे पाच पाच खाती होती.
शिंदेसेना आणि भाजपा यांचे मंत्रीमंडळ बनवताना मोठी कसरत होणार आहे. उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिलेल्या विधानपरिषदेच्या जागेवर शिंदेगटातून कुणाला घ्यायचं. विधानपरिषदेतून मंत्री करायचे का? असाही एक उपप्रश्नही त्यात आहे.