एक्स्प्लोर
Budget 2017 : राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार
मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प आज (18 मार्च) सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र कर्जमाफीची मागणी आणि सभागृहात होणाऱ्या गोंधळाचं या अर्थसंकल्पावर सावट असल्याने आज नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे.
याच पार्श्वभूमीवर काल (17 मार्च) रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कॅबिनेटच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. आज मुख्यमंत्री सभागृहात याबाबत निवेदन करतील.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्पाचं वाचन सुरु करतील. तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत अर्थसंकल्पाचं वाचन करतील.
मात्र अर्थसंकल्प जरी मंजूर केला तरी आम्ही कर्जमुक्तीच्या मुद्यावर ठाम असल्याचं शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी सांगितल. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन आक्रमक झालेले विरोधक आणि शिवसेना आज सभागृहात काय भूमिका मांडणार, हे पाहण महत्वाचं असणार आहे.
संबंधित बातम्या:
‘वर्षा’वरील कॅबिनेट बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी!
महाराष्ट्राच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून ठोस आश्वासन नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement