Maharashtra Breaking News Live Updates : सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते 28 तारखेच्या मोर्चाला हजेरी लावणार
Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर..
LIVE
Background
मुंबई : राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. कल्याण, पणे, बीड या जिल्ह्यांतील हत्यासत्र आणि महिला अत्याचारांच्या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. हाच मुद्दा घेऊन विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. दुसरीकडे पालकमंत्रिपदावरूनही मंत्र्यांमध्ये चढाओढ लागली आहे. आपापल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मिळावे, यासाठी मंत्री पूर्ण ताकद लावत आहेत. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातून लोक दिल्लीला पोहोचत आहेत. संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रमुख तसेच देसभरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
सलगच्या सुट्ट्यांमुळे कुंभनगरीत पर्यटकांची मांदियाळी
सलगच्या सुट्ट्यांमुळे कुंभनगरीत पर्यटकांची मांदियाळी
नाशिक शहरातील रामकुंड, तपोवन,पंचवटी परिसरात धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी परराज्यातून पर्यटक दाखल...
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते 28 तारखेच्या मोर्चाला हजेरी लावणार
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते 28 तारखेच्या मोर्चाला हजेरी लावणार
खा.बजरंग सोनवणे,
आ.संदीप क्षीरसागर,
आ प्रकाश सोळंके,
आ.सुरेश धस,
आ जितेंद्र आव्हाड,
अंजली दमानिया
मनोज जरांगे पाटील
छत्रपती संभाजी राजे भोसले
मंत्रालयात पंकजा मुंडेंनी पूजा करत स्वीकारला पदभार
पंकजा मुंडेंनी खात्याचा घेतला पदभार
मंत्रालयात मुंडेंनी पूजा करत स्वीकारला पदभार
नवीन वर्षात जे जे रुग्णालयात यंत्रमानव शस्त्रक्रिया होणार, डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ यांना दिले जात आहे प्रशिक्षण
नवीन वर्षात जे जे रुग्णालयात यंत्रमानव शस्त्रक्रिया होणार
डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ यांना दिले जात आहे प्रशिक्षण
-नवीन वर्षात जे जे रुग्णालयात यंत्र मानव शस्रक्रिया केली जाणार आहे. खाजगी हॉस्पिटल ही शस्रक्रिया उपलब्ध असली तरी लाखो रुपये मोजावे लागतात.
मात्र आता गोर गरीब जनतेला रुग्णांना वेगवेगळ्या योजनानमधून जेजे रुग्णालयात यंत्रमानव शस्रक्रियेचा उपयोग घेता येणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ व्हावा यासाठी जेजे रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. सध्या हॉस्पिटल मधील परिचारिका डॉ यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे.
यंत्र मानवाच्या हाताला असलेला प्रोब 360 अंशामध्ये फिरत असल्याने डॉक्टरांना यंत्र मानवाच्या मदतीने शस्रक्रिया करणे सोपे जाणार असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.
एस.टी. को ॲापरेटिव्ह बँकेत सूरू आसलेल्या गैव्यवहारप्रकरणी पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलनंस
पुणे
पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलनं
एस.टी. को ॲापरेटिव्ह बँकेत सूरू आसलेल्या गैव्यवहारप्रकरणी एसटी कर्मचारी आक्रमक
बँकेत अनागोंदी कारभार सूरू असल्याचा आरोप करत पुण्यात कर्मचाऱ्यांच आंदोलनं
सहकार आयुक्त कर्यालावर कर्मचारी काढणार मोर्चा
शासनाने नेमलेल्या शहाजी पाटील कमिटीने बॅंकेची सखोल चौकशी करून एकून २८ मुद्यांमध्ये सदावर्तेंच्या पॅनलला दोषी ठरवून संचालक मंडळावर कारवाई करावी आंदोलनं करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी