Maharashtra Breaking News Live Updates : मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
Maharashtra Election Results News Live Updates: आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
LIVE

Background
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संविधानाचे पूजन, संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संविधानाचे पूजन
संविधान दिनानिमित्त फडणवीसांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
सागर निवासस्थानी फडणवीसांनी संविधानाच्या प्रतीचे केले पूजन
राष्ट्रवादीच्या पराभूत आमदारांच्या बैठकीत सर्वच उमेदवारांची निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याची भूमिका
राष्ट्रवादीच्या पराभूत आमदारांच्या बैठकीत सर्वच उमेदवारांनी निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याची भूमिका मांडली
आमदारांनी बैठकीत इव्हीएम बाबत रोष व्यक्त केला
महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारानी भूमिका घ्यावी अशी देखील आमदारांनी विनंती व्यक्त केली
आमदार जितेंद्र आव्हाड स्वत निवडून आले असले तरी त्यानी देखील इव्हीएम बाबत रोष व्यक्त केला
सूत्रांची माहिती
एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री, राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले.
यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते.
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
राज्यपालांकडे सोपवला राजीनामा
देवेंद्र फडणवीस, अजित पवार राजभवनावर दाखल
देवेंद्र फडणवीस, अजित पवार राजभवनावर दाखल
एकनाथ शिंदेदेखील राजभवनावर दाखल
थोड्याच वेळात शिंदे राजीनामा देणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

