Maharashtra Breaking News LIVE Updates :नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला भीषण आग
Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर...ाज्या

Background
मुंबई : राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सत्ताधारीदेखील विरोधकांना तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देताना दिसतायत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मुंबईतील बोट दुर्घटनेमुळेही संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला भीषण आग
- नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला भीषण आग
- अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल
परभणी दगडफेक प्रकरणावर फडणवीसांचे विधिमंडळात उत्तर, सांगितलं संविधानाच्या शिल्पाकृतीसोबत नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी दिले परभणीतील दगडफेकीवरील उत्तर
- परभणीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिमा संदर्भात परिस्थिती निर्माण झाली
- बीडमधील निघृण झालेली हत्या यावर सदस्य बोलले
- परभणीत दत्तराव सोपानराव पवार या माणसाने संविधानाची प्रत आहे त्याची काच फोडली आणि खाली फेकली
- त्यानंतर घटना घडली
- जमाव यायला सुरुवात झाली
- जिल्हाधिकारी याना फोन केला त्यांना बोलावलं
- जिल्हाधिकारी यांनी हार घातला
- लोक गेली मात्र काही ६० ते७० लोकांनी रेल्वे रोखली
























