Maharashtra Breaking News: हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस; बीड-परभणीच्या मुद्द्यांवर आज विधानसभेत होणार चर्चा
Maharashtra Breaking News 18th December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

Background
Maharashtra Breaking News 17th December 2024 Live Updates: महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. विधानसभेच्यानंतर विधानपरिषदेचे प्रमुख पदही भाजपकडेच राहणार आहे. भाजप महायुतीतर्फे राम शिंदे भरणार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
दुख:द बातमी; राज्याचे माजी गृहमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या वडिलांचे निधन
अकोला : राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे वडील आणि माजी आमदार विठ्ठलराव पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झालंय. ते मृत्यूसमयी 90 वर्षांचे होतेय. व्ही. एन. उर्फ विठ्ठलराव पाटील हे 1985 ते 92 या काळात अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर आमदार होते. त्याआधी ते अकोला जिल्हा परिषदेचे सभापती राहिलेयेत. आज दुपारी 3 वाजता त्यांच्यावर अकोल्यातील उमरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेय. यावेळी जिल्हासह राज्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होतेय.
वसईत हिट ॲण्ड रनची घटना; 14 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
वसई : वसईत आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास हिट ॲण्ड रनच्या घटनेत एका 14 वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शाहिस्ता इम्रान शाह (14) असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती वाजा मोहल्ला, पापडी येथे राहात होती.
शाहिस्ता उजेफा उर्दू हायस्कूल, कोळीवाडा येथील 9 वीची विद्यार्थिनी होती. शाळा सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी बस पकडण्यासाठी निघाली होती. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी वाहनाने तिला जोरदार धडक दिली. या घटनेत शाहिस्ता गंभीर जखमी झाली होती आणि तिला तात्काळ वसईच्या कार्डीनल ग्रेसेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार 15 ते 16 वर्षाचा असल्याचा प्रत्यदर्शीने सांगितलं आहे. तर दुचाकीवर नंबर प्लेट वर गाडीचा नंबर लिहला नव्हता. तर तेथे “आदिशक्ती माय” असं लिहिलेलं होतं. घटनेनंतर दुचाकीचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. या घटनेने वसई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.























