Maharashtra Breaking News LIVE: मकोका दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, परळी बंदची हाक
Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी (Torres Scam) अखेर ईडीने गुन्हा दाखल करत तपासल सुरूवात केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच राज्यात थंडीच्या कडाका वाढणार असून पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Walmik Karad MCOCA : मकोका दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, परळी बंदची हाक
वाल्मिक कराडला आज न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच वाल्मिक कराडवर मकोका देखील लावण्यात आला आहे. यानंतर परळीत वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक आल्याचे दिसून येत आहे. कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे.
Nashik News : नाशिकमध्ये नायलॉन मांजाने एकाचा बळी
नाशिकमध्ये नायलॉन मांजाने एकाचा बळी
- नाशिकच्या पाथर्डी परिसरातील घटना
- जिल्हा रुग्णाला उपचारासाठी केले होते दाखल
- मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांकडून घोषणा
- सोनू किसन धोत्रे अस नायलॉन मांजामुळे मृत्यू झालेल्या 23 वर्षीय युवकाचे नाव.
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शिवसेना नेत्यांची आज महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मंत्री आमदार व खासदारांची आज महत्वाची बैठक
नरीमन पाॅईटच्या ट्रायडेन्ट हाॅटेलमध्ये ही बैठक आज सायंकाळी ८ वा होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री आमदार व खासदार एकत्रित जाणार
आजच्या बैठकित राज्यातील प्रलंबित प्रकल्पांबाबत माहिती घेऊन ती मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जाणार
मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आजच्या बैठकीला विशेष महत्व
Pune Crime : पुण्यात खंडणीची मागणी करत दुकानदाराला जबर मारहाण
पुणे : पुण्यात खंडणीची मागणी करत दुकानदाराला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना वारजे माळवाडी परिसरात घडली. लॉन्ड्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदाराकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी ओंकार उर्फ खंड्या वाघमारे (21) या सराईताविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे शिवणे परिसरात दांगट पाटीलनगर येथे लाँन्ड्रीचे दुकान आहे. तीन दिवसांपूर्वी आरोपी वाघमारे तिथे आला होता. त्याने या दुकानदाराला धमकी दिली. 'या भागाचा मी दादा आहे. या भागात व्यवसाय करायचा असेल, तर दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल', असे म्हणत पैसे न दिल्यास दुकान जाळून टाकण्याची धमकी त्याने दिला. आरोपी वाघमारे याच्याकडे एक गज होता. आरोपीने दुकानदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील केली. तसेच त्याने एका गाडीची काच फोडत खंडणी मागितली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
Makar Sankrant 2025 : येवल्याच्या नभांगणी पतंगाची उंचच उंच भरारी, हजारो पतंगांनी आकाश व्यापले
येवला : गुजरातनंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पतंगोत्सव नाशिकच्या येवल्यात साजरा होत आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने येवलेकरांनी हजारो पतंग आकाशात उडवत आहे. विविध राजकीय नेते पक्ष यांच्या प्रतिमा असलेल्या व विविध रंग-बिरंगी पतंगांनी आकाश व्यापले आहे. येवल्याच्या नभांगणात विविध रंगी पतंगाने उंचच उंच भरारी घेतली. सकाळपासूनच येवलेकरांच्या उत्साहाला पारावार उरला नव्हता. अगदी लहानग्यापासून तर वयोवृद्ध असलेल्यांनी देखील संपूर्ण येवलेकर कुटुंबीयांनी धाब्यावर, गच्चीवर जावून पतंग उडविण्याचा आनंद घेतला.