Maharashtra Breaking News Live Updates: कुर्ल्यातील अपघातानंतरचा धक्कादायक VIDEO Viral; हेल्मेट घातलेल्या युवकानं सर्वांसमोर मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Maharashtra Breaking News 12th December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

Background
Maharashtra Breaking News 12th December 2024 Live Updates: मंत्रिपदांच्या वाटपाचा सस्पेन्स येत्या काही तासांत संपुष्टात येऊ शकतो. महाआघाडी सरकारमध्ये कोणत्या पक्षातून किती आणि कोणते मंत्री केले जाणार याचे चित्र लवकरच स्पष्ट होऊ शकते. कारण यावर मोठे विचारमंथन झाले. काल रात्री दिल्ली.आणि त्या विचारमंथनानंतर जी बातमी समोर आली आहे ती म्हणजे भाजपमधून 20 मंत्री केले जाऊ शकतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून 12 मंत्री केले जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या पक्षातील 10 मंत्र्यांचा फॉर्म्युला निश्चित होऊ शकतो.
बीड अपहरण, हत्येप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणेंनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट
बीड जिल्ह्यात खून, मारामाऱ्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना पोलीस निपक्षपातीपणे कारवाई करायचे सोडून अशासकिय लोकांच्या दबावात काम करत आहेत. यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, अपहरणांच्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले.
छत्रपती संभाजीनगर शहरात NIA ची कारवाई
शहरातील बीड बायपास भागात असलेल्या मदरशातू NIA च्या पथकाने एकाला ताब्यात घेतलं
NIA च्या पथकाने 22 वर्ष तरुणाला ताब्यात घेतलं
महाराष्ट्रात अमरावती ,भीविंडी, छत्रपती संभाजीनगर शहरात NIA एकाचवेळी कारवाई
तीनही ठिकाणी प्रत्येकी एकाला ताब्यात घेतले
NIA ची संपूर्ण देशभरात कारवाई
अशी वेळ जिल्ह्यात पुन्हा येऊ नये, संतोष देशमुख प्रकरणावर पंकजा मुंडे म्हणाल्या..
सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्यावर भरभरून प्रेम करतात केस तालुक्यातील माझ्या लहान भावांनो सोबत मी काम केलं होतं मी कधी पक्ष बघितलं नाही मी माणुसकीचं नातं पाहिलं कोणाच्यातरी आईचं लेकरू सकाळी निघाले आणि रात्री घरी आले नाही त्या आईच्या दुःखात मी सहभागी आहे त्या घरातील प्रत्येक स्त्रीच्या त्याच्या भावाच्या आई-वडिलांच्या दुःखात मी सहभागी आहे आज अशी परिस्थिती पुन्हा बीड जिल्ह्यात येऊ नये अशा पंकजा मुंडे यांनी देवाला प्रार्थना केली आहे























