Maharashtra Breaking News Live Updates: राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. आंबेडकरी अनुयायांचा आज परभणी ते मुंबई लाँग मार्च निघणार आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या आरोपींवर कारवाई न झाल्यानं आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत. दुपारी १ वाजता परभणीतून हा लॉंग मार्च मुंबईकडे निघणार आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
नांदेडचा बीड करायचा नाही, पालकमंत्री म्हणून मुंडे बंधू नकोत; सकल मराठा समाजाची मागणी
नांदेड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आता हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाने आज पत्रकार परिषदेत दिली आहे. आता पर्यंतची मागणी होती त्या मागण्या पूर्ण होत आहे. तपासावर आम्ही समाधानी आहोत. त्यामुळे मोर्चा हा स्थगित केला आहे. तसेच नांदेडचा पालकमंत्री मुंडे बंधू नको, जर नांदेडला पालकमंत्री मुंडे बंधू दिलेत तर इथला गोर गरीब समाज रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा देखील सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.
झालेली घटना अतिशय दुर्दैवी; सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
Eknath Shinde: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात घुसून चाकूहल्ला झाल्याची घटना घडलीय. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. कलावंतावर हल्ला होणे चुकीचे आहे. हल्लेखोराला अटक झाली आहे. चोरीचा हेतू होता असं प्राथमिकदृष्टया दिसतंय. यावर तपास सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.
दरम्यान, नाशिकच्या कुंभमेळ्यात कोट्यवधी भक्त येतात. त्याच्या तयारीच्या दृष्टीने बैठक आयोजित केली होती. सर्व व्यवस्थांचा आढावा घेतला. प्रयागराजमध्ये केलेल्या योजनांचाही आम्ही अभ्यास करू. प्रत्यक्ष टीम तिथं जाईल. नदीचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेवू. क्यूआर कोड, एआयचा वापर केला जाईल. एअर एम्बूलन्सचीही व्यवस्था करतोय.आजपासूनच काम सुरू करतोय.परत पुढील महिन्यात बैठक होईल, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळे आपण सर्वजण आहोत- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
शिवाजी विद्यापीठाच्या 61 वा दीक्षांत समारंभ पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ झाला... यावर्षी तब्बल 51 हजार स्नातकांना पदवी देण्यात येणार आहे. त्यामध्ये 14 हजार जणांना विद्यापीठ याठिकाणी पदवी देण्यात येणार आहे तर उरलेल्यांना पोस्टाद्वारे पदवी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा द्विभाषिक पदवी देण्यात येणार आहे. यामध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन भाषांचा समावेश आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळे आपण सर्वजण आहोत. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आज मी सी. पी. राधाकृष्णन म्हणून तुमच्या समोर नसतो, असं विधान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केलं.
राज्याचे एआय धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती
राज्याचे एआय धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती
नवे धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्स करणार शिफारशी
पुढील ३ महिन्यात शिफारस करण्याचे टास्क फोर्सला आदेश
एआय वापरास गती देण्यासाठी नवे धोरणाची निर्मिती होणार
महिती तंत्रज्ञान संचालनालय विभागाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमणूक
टास्क फोर्समध्ये एकूण 16 सदस्यांची नियुक्ती
गुगल, महिंद्रा ग्रुप, एचडीएफसी लाईफ अशा खाजगी संस्थांवरील अधिकाऱ्यांचाही समितीत समावेश