(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking Updates LIVE : पुणे शहरातील कोथरूड परिसरात अपघात, 36 वर्षीय महिलेचा मृत्यू, दोन जण जखमी
Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसत आहेत. दुसरीकडे सध्या राज्यात गणेशोत्सवाची धूम आहे. सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. राज्यात काही ठिकाणी पावसाने उसंत घेतली आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल, अमित शाहांची खात्री
महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल याची खात्री अमित शाह यांनी महायुतीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांना दिली
ज्या जागा निवडून येतील त्याचा लवकरात लवकर आढावा घेऊन एकत्रित बैठक करण्याच्या शाह यांच्या सूचना
पुढील महायुतीच्या नेत्यांची पुन्हा दिल्लीत बैठक पार पडणार
जागा वाटपांबाबत दिल्लीत अंतीम चर्चा होण्याची दाट शक्यता
महायुतीच्या नेत्यांची एकुण 45 मिनिटं अमित शाह यांच्यासमवेत चर्चा
सूत्रांची माहिती
कर्जत नेरळमधील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी तीन जण ताब्यात
रायगड - कर्जत नेरळ मधील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी तीन जण ताब्यात
हत्येचा संशय असल्याने नेरळ पोलीसांनी घेतले तिघांना ताब्यात
चौकशी सुरू
ताब्यात घेतलेले तिघेही मयतांचे नातेवाईक
जयंत पाटील आज पुण्यात, पत्रकार संघात देणार व्याख्यान
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज पुण्यात
पुण्यातील पत्रकार संघात जयंत पाटलांच व्याख्यान
श्रमिक पत्रकार संघाच्या व्हिजन २०५० या कार्यक्रमात जयंत पाटील यांची हजेरी. जयंत पाटील काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष..
शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा- प्रविण दरेकर
शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा
एकीकडे ज्ञानेश्वर महाराव यांच्या उपस्थितीत हिंदू देवतांचा अपमान ऐकायचा आणि दुसरीकडे दर्शनासाठी यायचं हे ढोंग आहे
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची शरद पवार यांच्यावर टीका
ज्ञानेश्वर महाराव यांनी पवारांच्या उपस्थितीत हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह टीका केल्याचाही समाचार
पिंपरी चिंचवडमध्ये ऐन गणेशोत्सवात एकाची हत्या
पिंपरी चिंचवडमध्ये ऐन गणेशोत्सवात एकाची हत्या झाल्याचं उघडकीस आलंय. काळेवाडीतील फुटपाथवर दोन बेंचच्या मध्ये हा मृतदेह आज सकाळी आढळलाय. मृतदेहाच्या लगत रक्ताने माखलेला सिमेंटचा गठठू असल्यानं ही हत्याचं असेल त्याच दिशेने पोलिसांचा तपास सुरुये. मध्यरात्री तीनच्या नंतर ही घटना घडल्याचा वाकड पोलिसांचा अंदाज आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही, ती ओळख पटली की हत्या करणारा कोण हे उघड होणार आहे. वाकड पोलीस त्याच दिशेने सध्या तपास करतायेत.