Maharashtra Breaking 5th August LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra Breaking 5th August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking 5th August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तूर्तास लांबणीवर. आज मुख्यमंत्री पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर असणार.
2. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज सोलापूर दौ-यावर. सोलापुराच्या शासकीय विश्रामगृह येथे राज ठाकरे सकाळी 10 पासून घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक.
3. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज अमरावतीला. दर्यापूर येथे आंबेडकरांची सभा पार पडणार
4. उद्धव ठाकरेंचा सहा ते आठ ऑगस्ट दिल्ली दौरा असणार. दिल्लीत ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार. विधानसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत
चर्चा होण्याची शक्यता.
5. 'श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन' उपक्रम आजपासून सुरु होणार, यामाध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोफत तीर्थाटनाचा आनंद घेता येणार, श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम
Nashik Rains : गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू
Nashik Rains : गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचविण्यासाठी धुळे येथून एस.डी.आर.एफ.ची टीम रात्री घटनास्थळी दाखल असून अंधारामुळे बचाव कार्य थांबविण्यात आले होते. सकाळी अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात करण्यात आली..मात्र पुराच्या पाण्यात वाढ झाली असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहे..त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी कमी होताच पुन्हा बचाव कार्य सुरु केले जाणार आहे. दरम्यान, मासे पकडण्यासाठी गेलेले व पाण्यात अडकलेले सर्वजण एका उंच खडकावर असल्यामुळे सुखरूप आहे. मागील 12 ते 14 तासांपासून ते अडकून पडले आहेत..संपूर्ण रात्र त्यांना खडकावर बसून काढावी लागली.
Nashik Rains : सुरगाण्याच्या देवमाळ ते उंबरदे पुल पाण्याखाली
Nashik Rains : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पावसाने थैमान घातले असून, देवमाळ ते अंबडदहाड नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दळणवळणाची सोय बंद झाली आहे.शाळकरी मुलांना शाळेत जाणं अशक्य झाले. दवाखान्याची सोय नसल्या कारणाने गर्भवती महिला, आजारी ग्रामस्थ यांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जीव धोक्यात टाकून नदी ओलांडावी लागत असते. ही जीवघेणी कसरत नागरिकांच्या जीवावर बेतात शक्यता असून सदर पुलाची उंची वाढविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.























