(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking 2nd August LIVE Updates: लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका; मंगळवारी तातडीची सुनावणी
Maharashtra Breaking 2nd August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
LIVE
Background
Maharashtra Breaking 2nd August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Sindhudurg News: सावंतवाडीतील जंगलात लोखंडी साखळीनं बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या 'त्या' अमेरिकन महिलेला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्गमधून रत्नागिरीत
Sindhudurg News: सावंतवाडीतील सोनुर्ली रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या "त्या" अमेरिकन महिलेला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग मधून रत्नागिरी येथे मानसिक रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती बांदा पोलिसांनी दिली. तसेच ती महिला प्रथमदर्शी मानसिक रुग्ण असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र यात पोलिसांकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे तिच्या आधारकार्ड वरील पत्यावर सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथक गेली असून त्या पत्यावर पोलिसांना काही सापडलेले नाही. अमेरिकन महिला योग्य माहिती देत नसल्याने पोलिसांसमोर तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शरद पवार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,देवेंद्र फडवणीस,उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा
मिटकरी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या काय गाड्या फोडतात गाड्या फोडायच्या आहेत तर तुम्हाला तर शरद पवार उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या फोडा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी परभणीच्या गंगाखेडमध्ये केले आहे. प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने परभणीत होते परभणीतून ते आज गंगाखेड येथे गेल्यानंतर तिथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी अशा प्रकारचं विधान केलंय.. तसेच जिंतेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांना चिल्लर म्हणुन संबोधले आहे.
Dhule News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग, मूर्त्यांच्या भावात यंदा दहा टक्क्यांची वाढ
Dhule News : विघ्नहर्ता गणरायाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मूर्तीकरांची लगबग सुरू झाली आहे. अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून मूर्तिकारांनी या कामाला वेग दिला आहे मात्र दुसरीकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याच्या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नसून त्याबाबतचे आदेश आपल्याला प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या असून ग्राहकांकडून याच मुर्त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या तयार झाल्या असून यंदा मुर्त्यांच्या भावात दहा टक्क्यांची वाढ झाली आहे अशी माहिती धुळे शहरातील सुप्रसिद्ध मूर्तिकार खरे यांनी दिली आहे.
Maharashtra News : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा
Maharashtra News : कोकणात महायुतीत विधानसभेच्या जागांवरून शिमगा होणार का? असा प्रश्न आता उभा राहिला आहे. याचं कारण म्हणजे भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील पारंपारिक दोन मतदारसंघ सोडले जावेत अशी मागणी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे. दरम्यान भाजपला एकही जागा न मिळाल्यास आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत असा दावा देखील सावंत यांनी केला आहे. तसेच वेळ पडलीच तर आम्ही स्वतंत्रपणे देखील विधानसभा निवडणूक लढू असे देखील सावंत यांनी म्हटलं आहे. पारंपरिक विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख करताना सावंत यांनी रत्नागिरी आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघाचे नाव घेतलं नसलं तरी रत्नागिरी आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार होते. पण सध्यास्थितीचा विचार केल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे दक्षिण जिल्हाध्यक्षांनी केलेल्या या मागणीला आता कार्यकर्त्यांनी देखील उचलून धरल्याचे चित्र आहे. दरम्यान याबाबत आता भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार? याबाबतची चर्चा रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Maharashtra News : जगात जर्मनी अन खड्ड्यात परभणी; शहरात येणारे रस्ते असो की शहरातील प्रमुख रस्ते असो सर्वत्र खड्डेच खड्डे
Maharashtra News : जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण परभणी बाबत प्रचलित आहे मात्र काही दिवसांपासून परभणी एका वेगळ्याच प्रश्नावरून प्रसिद्ध झाली आहे ती म्हणजे खड्ड्यांसाठी त्यामुळेच जगात जर्मनी आणि खड्ड्यात परभणी अशी म्हणण्याची वेळ परभणीकरांना आलीय.परभणी शहरातील प्रमुख रस्ते असो किंवा परभणी शहरात येणारे प्रमुख रस्ते असो सर्वच ठिकाणी गुडघ्यापेक्षा मोठे मोठे खड्डे झालेत आणि यामुळे पाऊस पडला तर पाण्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकजण पडत आहेत.