(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra breaking Live: शिवसेना शिंदे गटातील मुंबईतील नेत्याचीं आज महत्वाची बैठक, जागांसंदर्भात होणार चर्चा, श्रीकांत शिंदे घेणार मतदार संघांचा आढावा
Maharashtra News Live Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी राज्यात सुरु आहे. विविध राजकीय पक्ष आपआपली रणनीती आखत आहेत.
LIVE
Background
Maharashtra News Live Updates: राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) धामधूम सुरु असून राजकीय वारे जोमाने वाहू लागत आहेत. विधानसभा निवडणूक 2024 साठी सर्वपक्षीयांकडून निवडणूक याद्या जाहीर होत आहेत. काँग्रेसने आज दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. त्याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दुसरी यादी जाहीर केली आहे.
Vidhan Sabha Election 2024: माहिम विधानसभेची निवडणूकीचं ऐन रंगात, अमित ठाकरेंसाठी भाजप आणि शिवसेनेची लॅाबिंग
Vidhan Sabha Election 2024: माहिम विधानसभेची निवडणूकीचं ऐन रंगात,
अमित ठाकरेंसाठी भाजप आणि शिवसेनेची लॅाबिंग !!
भाजपा करणार शिवसेनेची मनधरणी, तर शिवसेना करणार सदा सरवणकरांची मनधरणी ?
दीपक केसरकरांनी घेतली राज ठाकरेंपाठोपाठ सदा सरवणकरांची भेट
सदा सरवणकर करणार सकारात्मक विचार ?
अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर त्याग करणार का?
वरळीत २०१९ साली आदित्य ठाकरेंसाठी राज ठाकरेंनी दिला नव्हता उमेदवार
२०२४ ला एकनाथ शिंदेंच्या विरोधात मनसेनंही दिला नाही उमेदवार
Nashik - चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघात केदा आहेर हातात तुतारी घेण्याची शक्यता, गुप्त बैठक झाल्याची जोरदार चर्चा...
Nashik - चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघात केदा आहेर हातात तुतारी घेण्याची शक्यता..
- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस यशवंत गोसावी आणि केदा आहेरांमध्ये गुप्त बैठक झाल्याची जोरदार चर्चा...
- चांदवड-देवळा मतदार संघाची जागा आहे काँग्रेसच्या वाट्याला..
- काँग्रेसचा दुसऱ्या यादीतही चांदवडच्या अद्याप उमेदवार जाहीर नाही..
- त्यामुळे राजकीय घडामोडी घडून ही जागा शरद पवार राष्ट्रवादीला मिळण्याची आहे शक्यता..
- केदा आहेर भाजप उमेदवारी न मिळाल्याने नाराज..
- अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे केले आहे जाहीर...
Politics: सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त वक्तव्य प्रकरण, अजित पवार यांचा सुजय विखे यांना फोन
Politics: सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त वक्तव्य प्रकरण
अजित पवार यांचा सुजय विखे यांना फोन
अजित पवार यांनी सुजय विखे यांची सदर वक्तव्य प्रकरणी कानउघडणी केली
महायुतीला अडचणी निर्माण होतील असं कुठंलही वक्तव्य न करण्याची सूचना केली
सूत्रांची माहिती
Nashik - शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते बबन घोलप यांचा राजीनामा, मुलाला उमेदवारी दिल्याने राजीनामा
Nashik - शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते बबन घोलप यांचा राजीनामा
- ठाकरेंच्या शिवसेनेने मुलाला उमेदवारी दिल्याने राजीनामा
- समाजाच्या आणि मतदारसंघातील कामांचा शब्दही न पाळल्याची नाराजी
- ठाकरेंच्या शिवसेनेतील मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका करत घोलप यांनी सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत केला होता प्रवेश
- ठाकरेंची शिवसेना सोडत असताना अन्याय झाल्याची केली होती भावना व्यक्त, तर माजी मंत्री बबन घोलपांचा शिंदेंच्या शिवसेनेलाही जय महाराष्ट्र...
Mumbai: लाचखोरी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील तीन कर्मचाऱ्यांना अटक, पोलिसांकडून कायदेशीर कारवाई
Mumbai: लाचखोरी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील तीन कर्मचाऱ्यांना अटक
मयांक रावल, ऋषीकेश निकुंभ आणि प्रकाश ताटे अशी तिघांची नावं
तिन्ही कर्मचारी तीन वेगवेगळ्या न्यायमूर्तींच्या कोर्टात कार्यरत होते
हा प्रकार उघडकीस येताच काही दिवसांपूर्वी या तिघांची तक्रार मुख्य न्यायमूर्तींकडे करण्यात आली होती
त्यानंतर हायकोर्ट शिस्तपालन समितीनं या तिघांना कामावरून निलंबित केलं होतं
त्यानंतर याची रितसर तक्रार झाल्यानं पोलीसांनी केलीय कायदेशीर कारवाई