Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पावसात सात जणांचा मृत्यू, तीन जण बेपत्ता
Maharashtra Breaking 26 th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
LIVE
Background
Maharashtra Breaking News 26th July LIVE Updates: : सध्या राज्यात मोठ्या मुंबई, मुंबई उपनगर, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले. या भागातील नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. पुणे जिल्ह्यात तर जोरदार पाऊस होत असून या भागातील नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भागातील अनेक शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. आजदेखील (26 जुलै) या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागातील पावसासह राज्यभरातील पावसाचे तसेच इतर अपडेट्स तुम्हाला येथे वाचता येतील.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जास्तीत जास्त जागा जिंकता याव्यात यासाठी राजकीय पक्षांनी आतापासून तयारी चालू केली आहे. त्यामुळे राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व घडामोडींचे अपहेट्स वाचा एका क्लीकवर...
पुणे जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पावसात सात जणांचा मृत्यू, तीन जण बेपत्ता
पुणे जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पावसात सात जणांचा मृत्यू झालाय तर तीनजण बेपत्ता आहेत. तीन युवकांचा डेक्कन भागात शॉक लागून मृत्यू झाला. एक जण कात्रज भागातून वाहणाऱ्या आंबील ओढ्यात वाहून गेला. एक जण मुठा नदीत वाहून गेला. एक जण इंद्रायणी नदीत बुडाला. तर ताम्हिणी घाटात दरड कोसळून एकचा मृत्यू झाला. तर लवासामध्ये दोन बंगल्यांवर दरड कोसळून तीघेजण बेपत्ता झालेत.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी
वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरात लेनवर पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.
वसई हद्दीत नायगांव येथील वासमारे ब्रिज ते माळजीपाडा, वर्सोवा ब्रीज पर्यंत ही वाहतूक कोंडी झालेली आहे.
महामार्गावर सुरु असलेले निकृष्ठ दर्जाचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम, त्यामुळे रस्त्यात पडलेले खड्डे यामुळे ही वाहतूक कोंडी होत आहे.
मागच्या सहा महिन्यांपासून वाहनधारक वाहतूक कोंडीचा सामना करीत आहेत. मात्र महामार्ग प्रशासन याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे वाहनधारकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, राजन विचारेंचे कट्टर समर्थक शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता
ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का
-युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
-राजन विचारेंचे कट्टर समर्थक शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता..
पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, एक जूनपासून 3210 मिलीमीटर इतका पाऊस
लोणावळा, पुणे
-पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग
-गेल्या चोवीस तासांत तब्बल 239 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. म्हणजे 9.41 इंच इतका पाऊस कोसळलाय
-या एक जून पासून 3210 मिलीमीटर इतका पाऊस बरसला आहे, गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2760 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
-रात्री पासून पावसाने विश्रांती घेतलीय
बीकेसीतील धीरूभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीत दिसली 8 फुटी मगर
मुंबईत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे अशातच मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील धीरूभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीच्या पात्रात मगर आढळून आली आहे. मगर आढळून आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मगर आढळून आल्याची माहिती वाईल्ड लाईफ ऍनिमल प्रोटेक्शन अंड रेस्क्यू असोसिएशन कडून वन विभाग तसेच RAWW संस्थेचे मानद वन्य-जीव रक्षक यांना देखील माहिती कळविण्यात आली. यानंतर वनविभागाने ताबडतोब मगर आढळून आलेल्या ठिकाणी पाहणी केली. मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पाण्याच्या प्रवाहात ही मगर वाहत आली असावी असा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय मगर ही मानवी वस्तीत नसून तिच्या नैसर्गिक अधिवासातच आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. सध्या मगरीचा शोध घेण्याचं काम वनविभागाकडून सुरू आहे.