Maharashtra Breaking News Live Updates:राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर..
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत. त्यांचा संक्षिप्त स्वरुपातील आढावा...

Background
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्र राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत. राज्यातील थंडी आता गायब होऊ लागली आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस मध्ये आहेत. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडबाबत विविध माहिती समोर येत आहे. यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स... त्यांचा संक्षिप्त स्वरुपातील आढावा फक्त एका क्लिकवर..
Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप
अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप
कोल्हापूरच्या गडहिंग्लज एसटी स्टँड समोर अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप
मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला केलं पोलिसांच्या स्वाधीन
गडहिंग्लज परिसरात मुलींची छेड काढण्याचे प्रमाण वाढलं
गेल्या आठ दिवसातील मुलींची छेड काढण्याचा दुसरा प्रकार
Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळेला अद्याप अटक का केली नाही? सचिन खरात यांचा सवाल
मुंबई : संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे. वाल्मिक कराडला कुणाचा आशीर्वाद आहे. कृष्णा आंधळे याला अद्याप अटक का केली नाही? असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी उपस्थित केलाय. मुंबई येथील जनआक्रोश मोर्चात ते बोलत होते.
























