Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत.
LIVE
Background
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत. बीड प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याला आज व्हिसीद्वारे बीड जिल्हा न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. तर अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमेरिकेतही डोनाल्ड ट्रम्प महत्वाचे निर्णय घेत आहे. तर पालकमंत्रिपदावरुन राज्याचं राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत.
अमित शाह 24 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह 24 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर
सहकार विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला शाह यांची उपस्थिती
गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे कार्यक्रमाच आयोजन
पंढरपुरात वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी
संतोष देशमुख हत्याप्रकरणी वादात सापडलेल्या वाल्मिक कराड याच्याबाबतीत सरकार कठोर भूमिका घेत नसल्याचा सर्वत्र संतापाचे वातावरण असताना पंढरपुरातील काही तरुणांनी वाल्मिक कराड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देऊन आपला संताप व्यक्त केला. पंढरपुरातील मराठा समाजाचे नेते बापु शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायाम शाळेसमोर बीड जिल्ह्यातील खंडणीच्या गुन्ह्यातील अटक केलेला आरोपी वाल्मिक कराड याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली.
कारने बाळासह मावशीला उडवले, पिंपरी चिंचवडच्या सोसायटीतील अपघात सीसीटीव्हीत कैद
पिंपरी चिंचवडच्या सोसायटीत कारने बाळासह मावशीला उडवलंय. हा भीषण अपघातात सीसीटीव्हीत ही कैद झालाय. यात मुलाचा पाय फ्रॅक्चर झालाय तर मावशीला सुद्धा चांगलाच मार लागलाय. मोशीच्या प्रिस्टीन ग्रीन सोसायटीत हा अपघात 16 जानेवारीला झालाय, पण अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल नाही.
सिंदखेड राजा येथील स्नेहल ज्वेलर्स वरील दरोड्यातील चौघांना बेड्या
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 ऑगस्ट 2024 रोजी स्नेहल ज्वेलर्स वर रात्रीच्या सुमारास भिंतीला भगदाड पाडून दरोडा टाकण्यात आला होता यात मोठ्या प्रमाणात सोने व चांदीची लूट दरोडेखोरांनी केली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 22 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दरोडेखोरांकडून अजूनही काही ठिकाणी दरोडे टाकण्यात आल्याची माहिती आहे.
खेळताना शेकोटीत पडलेल्या ८ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
घरासमोर पेटवलेल्या शेकोटीमध्ये पडून गंभीररीत्या भाजल्या गेलेल्या देवांशू सुनील सोनवणे या 8 महिन्यांच्या बालकाचा 20 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे घडली.