Maharashtra Breaking News Live Updates : दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
Maharashtra breaking News Live Updates: आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

Background
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. या मतदानानंतर एक्झिट पोलचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वेगवेगळ्या संस्थांनी आपापल्या एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे निकाल दिले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण राज्याला निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. राज्यात जो-तो आपापल्या पद्धतीने निकालाचा अंदाज लावतो आहे. मात्र 23 नोव्हेंबर रोजीच नेमकी स्थिती स्पष्ट होणार आहे. तत्पुर्वी मतदानाची प्रक्रिया संपल्यानंर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे नेते मंडळी पुढील राजकीय वाटचालीसाठी विचारविनिमय करण्यासाठी एकत्र जमणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे नेतेही आपले पुढचे राजकीय डावपेच आखत आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
याचिका सुनावणी योग्य नसल्याचं स्पष्ट करत निकाली काढली
25 लाखांची अनामत रक्कम भरून चार आठवड्यांत हरित लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश
सदानंद कदम यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी दिलेल्या आदेशांना दिलंय आव्हान
कोल्हापुरात महानगरपालिकेच्या शाळेत पालकांचा गोंधळ, शाळेत घेत असलेल्या प्रार्थनेवर आक्षेप
कोल्हापुरात महानगरपालिकेच्या शाळेत पालकांचा गोंधळ
शाळेत घेत असलेल्या प्रार्थनेवर आक्षेप
जाधववाडी येथील शाळेतील प्रकार
शाळेसमोर नागरिकांची गर्दी
मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी























