Maharashtra News Live Update : गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल, 17 रस्ते वाहतुकीस बंद
Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Background
मुंबई : सध्या राज्यात मोठ्या घडामोडी होत आहेत. कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. दुसरीकडे राज्यात काही भागात पुन्हा एकदा पाऊस परतण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाचीही एकीकडे धूम आहे. पुणे आणि मुंबई यासारख्या महत्त्वाच्या शहरांत गणेश विसर्जनाची तयारी केली जात आहे.
चौथा मानाचा गणपती तुळशी बाग अलका चौकात दाखल
चौथा मानाचा गणपती तुळशी बाग अलका चौकात दाखल झाला आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुका यावेळी वेगाने पुढे जाताना दिसत आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई अलका चौकात दाखल होणार
थोड्याच वेळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अलका चौकात दाखल होतोय. चार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर दोन तासांच्या आत दगडूशेठ आलका चौकात येतोय. विसर्जन मिरवणुकांना लागणारा वेळ पाहता दगडूशेठचे वेळ पाळणे कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे.























