Maharashtra Breaking 15th July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking 15th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking 15th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. दरड कोसळल्यानं कोकण रेल्वेला फटका; मुंबईहून कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या 15 तासांपासून रखडल्या
2. दरड कोसळल्याने दिवा-रत्नागिरी पॅसेंजर रद्द, तर मांडवी, जनशताब्दी, तुतारी आणि तेजस अजूनही ट्रॅकवरच, दक्षिणेत जाणाऱ्या गाड्या पुण्यामार्गे
3. रायगड आणि रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट, दोन्ही जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, तर चिपळूण बाजारपेठेत शिरलेलं वाशिष्ठीचं पाणी ओसरलं
4. मुंबईतील पावसाने सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण
5. मुंबईला पाणी देणाऱ्या 7 धरणांमध्ये आता 35 टक्के पाणीसाठा, काल एका दिवसात 6 टक्क्यांची वाढ
महसूल कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप
महसूल विभागाचा आकृतिबंध लवकर मंजूर करावा, नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती मिळावी यासह विविध मागण्यांसाठी आज महसूल कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. वर्ध्यात देखील काम बंद करीत महसूल कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतलाय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. यादरम्यान विविध घोषणा देऊन मागण्या मान्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहेय. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra News: ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद मातोश्रीवर; उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी दाखल
Maharashtra News: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर आक्षेप घेतला होता. प्राणप्रतिष्ठा सोहळा शास्त्रानुसार होत नसल्याचं शंकराचार्यांचे म्हणणं होतं. यावेळी शंकराचार्यांच्या या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता.
दुसरीकडे राहुल गांधी यांनी हिंदुत्व आणि हिंसा यासंदर्भात काही दिवसांपूर्वी संसदेत भाषण करताना जो मुद्दा उपस्थित केला होता. त्यालासुद्धा अविमुक्तेश्वरानंद यांनी समर्थन दर्शवलं होतं.
























