Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीचे जागावाटप उद्या जाहीर केले जाण्याची शक्यता
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Background
मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. कोणत्याही क्षणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेता राज्यातील सर्व पक्ष कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील नेत्यांचे इनकमिंग आणि आऊटगोइंग चालू झालं आहे. निवडणुकीची घोषणा लक्षात घेता महायुती सरकारने गेल्या काही दिवसांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुंबईसारख्या शहरात पावसाने हजेरी लावली आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर.
राष्ट्रवादी पक्षाकडून पंकज भुजबळ यांनी घेतली आमदारकीची शपथ
राष्ट्रवादी पक्षाकडून पंकज भुजबळ यांनी घेतली आमदारकीची शपथ
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची घेतली भेट
जालना - उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेतलीय...
अंतरवाली सराटीत दोघांमध्ये भेट झाली. दोन तास चर्चा झाल्याची माहिती....
अंतरवालीच्या सरपंचाच्या शेतात भेट झाल्याची माहिती...
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झाल आहे....
भेटीमध्ये काय चर्चा झाली याची अद्याप माहिती नाही.























