Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने विरोधकांनी टीका सुरु केलं आहे.महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स
LIVE

Background
धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या पत्नी आज सीआयडी कार्यालयात जाणार..
Beed: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही माहितीची सीआयडीला धनंजय देशमुख आणि अश्विनी देशमुख यांच्याकडून खात्री करायची आहे.. म्हणूनच आज दुपारी केज विश्रामगृहातील सीआयडी कार्यालयामध्ये धनंजय देशमुख आणि अश्विनी देशमुख या जाणार आहेत. सीआयडीच्या अधिकाऱ्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही माहिती यावेळी दिली जाणार आहे.
राज ठाकरे यांची महेश मांजरेकरांच्या होटेल सुका सुखीला भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या होटेल सुका सुखीला भेट दिली आहे. सुका सुखीच्या 2 वर्ष पूर्ण होण्या निमित्ताने राज ठाकरे आज महेश मांजरेकरांचा होटेलला पोहचले आहेत.
पंढरपुरात दोन जीबीएस संशयित रूग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क
पंढरपूर: माघी यात्रेनंतर पंढरपुरात जीबीएसचे दोन संशयित रूग्ण आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले असून यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दोन्ही संशयित रूग्ण पंढरपूर शहरातील असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीबीएसचे रूग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने पंढरपूर शहरात पाहणी सर्वे सुरू केला आहे. सर्वे मध्ये शहरातील 30 हजार कुटुंबातील नागरिकांच्या आरोग्याची माहिती गोळा करण्यात आली आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे शहरातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आव्हान येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश सुडके यांनी केले आहे.

कृषीमंत्री कोकाटेंच्या प्रतीकात्मक प्रतिमेला स्वाभिमानीचे जोडे मारो आंदोलन; 'त्या' वक्तव्याचा केला निषेध
परभणी: शहरात आज( 15 फेब्रुवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन कृषी मंत्री कोकाटे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. काल कृषी मंत्री यांनी एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही आणि आम्ही एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांना दिली, असे वक्तव्य केले होते. याचाच निषेध म्हणुन परभणीत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध केलाय. शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्या बरोबर करणाऱ्या कृषी मंत्र्याना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज