Maharashtra Breaking LIVE Updates: निकृष्ट बांधकाम असलेली निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळली, बुलढाण्यातील घटना
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
LIVE
Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये झटपट घेता येईल...
राज्यात विधान परिषद निवडणुकांचे वारे
राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून आता विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची (Maharashtra Vidhan Parishad Election 2024) निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई (Mumbai News) पदवीधर, कोकण (Konkan News) विभाग पदवीधर, नाशिक (Nashik News) विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांकरिता निवडणूक होत आहे. एकूण 88 उमेदवार या निवडणुकीसाठी वैध ठरले होते. त्यापैकी 33 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यानं आता 55 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अजित पवारांची धगधगती तोफ साथ सोडणार? चर्चांना उधाण
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील अजित पवारांच्या ताफ्यातील धगधगती तोफ आता साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कोणाचंही नाव समोर आलं नसून महिला पदाधिकारी नाराज असून लवकरच पक्ष सोडणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच, ही नाराज महिला पदाधिकारी पूर्वाश्रमीची मनसे नगरसेविका होती, अशीही माहिती समोर आली आहे.
Praniti Shinde : खासदार झाल्यानंतर प्रथमच मंगळवेढा दौऱ्यावर आलेल्या प्रणिती शिंदेंचा ‘टमटम’मधून प्रवास!
Praniti Shinde : खासदार झाल्यानंतर प्रथमच मंगळवेढा दौऱ्यावर आलेल्या प्रणिती शिंदे यांनी ‘टमटम’मधून प्रवास केला आहे. मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ येथील ग्रामदैवत कामसिद्ध देवाची यात्रा भरली होती. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे कामसिद्ध देवीच्या दर्शनासाठी प्रथमच खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांनी हजेरी लावली होती.
Buldhana News : निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळली, निकृष्ट बांधकाम असल्याने मोठी दुर्घटना
बुलढाणा : शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या चिचारी या गावात पाण्याची टाकी बांधण्यात येत होती. जवळपास 95 टक्के या पाण्याच्या टाकीचे काम पूर्णही झालं होतं, मात्र ही पाण्याची टाकी आज अचानक कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्या या निकृष्ट दर्जाच्या असून या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशी करून 24 तासात या दोषींवर कारवाईत न झाल्यास जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत डीक्कर यांनी दिला आहे.
Pandharpur News : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग खचला
Pandharpur News : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग खचला....
पालखी मार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच दसुर फाटीजवळ दोन ते तीन किलोमीटर पालखी मार्ग खचला....
पंढरपूरहुन वेळापूरकडे जाणारी एक लेन तीन किलोमीटर पर्यंत बंद....
या ठिकाणी रस्त्याला पडल्या मोठमोठ्या भेगा.....
पालखी प्रस्थानाला काही दिवस उरले असतानाच मार्ग खचल्याने वारकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष....
Hingoli Water Issue : पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्यात 10 टँकर सुरू
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊनही टँकरची संख्या मात्र कमी होत नाही हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यात एकूण दहा टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय जिल्ह्यातील पवार तांडा नावाच्या गावात सुद्धा संपूर्ण उन्हाळा भरामध्ये टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय जून महिना लागून जवळपास दहा दिवस झाले चांगला दमदार पाऊस होऊन सुद्धा पाणीटंचाई कायम आहे.
Beed News: पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंबाबत सोशल माध्यमांवरील बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, ओबीसी समाज बांधव आक्रमक
Beed News: भाजप नेत्या पंकजा मुंडे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत सोशल मीडियातून बदनामीकारक पोस्ट केल्या जात आहेत. अशा पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी ओबीसी समाज बांधव आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर एकत्रित येत पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर आत्महत्या केलेल्या तीन तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत आल्यानंतर रस्त्यावरच ठिया देत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यानंतर महिलांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत पोस्ट करणाऱ्या वर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान पोलीस अधीक्षक यांनी अशा पद्धतीने पोस्ट करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले असून ओबीसी समाज बांधवांच्या प्रतिनिधींनी देखील अशा पोस्ट थांबवण्याचे आवाहन करत यापुढे आक्रमक भूमिका घेण्याचा देखील इशारा दिला आहे.