Maharashtra News Live Updates : नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची एकनाथ शिंदेंकडून गंभीर दखल, डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Background
मुंबई : राज्यात कोणत्याही क्षणात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेता राज्यातील सर्वच पक्ष आणि नेतेमंडळी तयारीला लागले आहेत. दुसरीकडे अभिनेता गोंविदा यांच्या पायाला बंदुकीची गोळी लागली आहे. अनावधानाने त्याच्यावर मिसफायर झालं आहे. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यपान केल्याचा आरोप मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र त्यांनी मद्यपान केले नव्हते, असे प्रथामिक चाचणीतून स्पष्ट झाले आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची एकनाथ शिंदेंकडून गंभीर दखल, डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे.
डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश
मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त श्री. भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, "आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे."
सोलापुरात काँग्रेस सरकारविरोधात आक्रमक, एकीकडे अर्धनग्न आंदोलन तर दुसरीकडे संग्राम मोर्चा!
सोलापूर ब्रेकिंग
---
एकीकडे प्रणिती शिंदे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी संग्राम मोर्चा काढतायत
तर दुसरीकडे अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या काँग्रेस कार्यालयसमोर शेतकरी अर्धनग्न आंदोलन करतायत
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असून काँग्रेसचे माजी आमदार सिद्धारम म्हेत्रे यांच्या मातोश्री कारखान्याने ऊस बिल दिले नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे
मागील 28 दिवसापासून हे सर्व शेतकरी काँग्रेस कार्यालयाच्या समोर आंदोलन करतायत





















