Maharashtra Breaking News Live Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्र, देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर..

Background
Maharashtra Breaking News Live Updates : राज्यात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडल्या आहेत. राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकमधून डिझेलची चोरी; घटना मोबाईल मध्ये कैद
वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रक मधून डिझेल चोरीचा प्रकार समोर आला असून या संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसापासून डिझेल चोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. मात्र, वाशिमच्या कारंजा येथील समृद्धी महामार्गावर टोलनाका परिसरात उभ्या असलेल्या ट्रक मधून मध्यरात्री ट्रकच्या डिझेल टाकी मधून मशीनच्या सहाय्याने डीजल चोरीचा प्रकार समोर आला आहे. या परिसरातीलच हे डिझेल चोर असल्याचं समोर येत आहे. गेल्या अनेक वेळा हा प्रकार एका ट्रक चालकाला दिसला. त्यानंतर त्यांनी मोबाईल द्वारे हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करत याबद्दलची माहिती दिली आहे. आता नेमकं पोलीस या प्रकरणाची कशी दखल घेणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र खरोखरच समृद्धी महामार्ग हा प्रवासासाठी सुखकर आहे का? असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलाय.
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी ठाण्यात होता कामाला; हॉटेल मालकही ताब्यात
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शेहजाद हा दादरहून वरळीला गेला होता
वरळीतील एका हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी तो यापूर्वी कामाला होता,त्या ठिकाणी सकाळी नाष्टा त्याने केला.
तिथे त्याने जी-पेने पैसे ही दिल्याची माहिती पुढे आली आहे.
तिथून पून्हा आरोपी शेहजाग हा दादरला आला. त्यानंतर तो दादरहून ठाण्याला गेल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
ठाण्यातील एका हॉटेलमध्ये तो काम करत होता. याच हॉटेलमध्ये चांगलं काम केल्याचा पार्श्वभूमिवर त्याचे कौतुकही केले होते.
दरम्यान या प्रकरणी, पांडे नावाच्या व्यक्तीने त्याला कामावर ठेवल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या मुकादम पांडेलाही ताब्यात घेतले आहे.
त्याचाही जबाब या प्रकरणात पोलीस नोंदवणार आहे.























