Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे शहरातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडवल्याची घटना घडली. हा कार चालक दारू पिऊन कार चालवत होता हे समोर आलं आहे. दारू पिऊन कार चालवणाऱ्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यातील जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी संध्याकाळी पुण्यातील भावे हायस्कूलजवळ ही घटना घडली. तसेच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात विविध माहिती समोर येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील बातम्यांसह देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
बी.के.सी परिसरात अनधिकृत हक्का पार्लरवर बीकेसी पोलिसांची मोठी कारवाई
पहाटे तीनच्या सुमारास हुक्का पार्लरमध्ये तरुण-तरुणींचा सुरू होता धिंगाणा
बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 74 जणांना केली अटक
हुक्का मालक आणि कामगार यांच्याकडून अवैधपणे तंबाखू युक्त हुक्का फ्लेवर अवैधरित्या विक्री करत असल्याची बी.के.सी पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती माहिती
बी.के.सी पोलिसांना माहिती मिळताच हुक्का पार्लरवर आज पहाटे 3 च्या सुमारास धाड टाकून 69 हुक्का पोट सोबत 6 जरी,दोन चिमटे,एक शेगडी आणि चाळीस हजार रुपयांची रक्कम केली जप्त.
या ठिकाणी विकला जाणारा तंबाखू युक्त फ्लेवर हुक्का कुठून आणला गेला यामध्ये आणखी कोण आरोपी आहेत का याबाबत अधिक तपास बीकेसी पोलिसांकडून सुरू आहे...
पुण्यातील सदाशिव पेठ अपघात प्रकरणी अपडेट
पुणे
पुण्यातील सदाशिव पेठ अपघात प्रकरणी अपडेट
चालक जयराम मुळे याची येरवडा कारागृहात रवानगी
आरोपी चालकाला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं
यावेळी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात सर्व पुरावे न्यायालयाच्या समोर मांडले
आरोपीकडे वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा नव्हता असे असताना त्याने वाहन चालवण्याचे धाडस केले आणि यातून हा अपघात घडला
सर्व तांत्रिक पुराव्यासह साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यायालयाला दिली माहिती
दारूच्या नशेत जयराम मुळे याने काल चहा पिण्यासाठी थांबलेल्या १२ जणांना उडवले होते























