Maharashtra Breaking LIVE: 'लाडक्या सूनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन' मोहीम सुरू, सासरी छळ होणाऱ्यांच्या मदतीला धावणार : एकनाथ शिंदे
Maharashtra LIVE Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यातील पावसाचे अपडेट्स मिळवा एका क्लिकवर.
LIVE

Background
Maharashtra Breaking Live Updates: या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला जातो... तुम्हाला सर्व अपडेट्स फक्त एका क्लिकवर मिळतील...
बारामतीतील PDCC बँक रात्री अकरा वाजता उघडी; अजितदादांचे पीए, भरणेंचे सहकारी उपस्थित,बँकेतून पैसे वाटपाचा आरोप, बारामतीतील राजकारण तापलं
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीतील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे. बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी (PDCC Bank) बँक ही रात्री अकरा वाजता देखील उघडी होती असा आरोप करण्यात आला आहे. याच बँकेत (PDCC Bank) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या यादी देखील सापडल्या असा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आलेला आहे. रात्रीच्या अकरा वाजता नेमकी ही बँक (PDCC Bank) का उघडी ठेवण्यात आली होती याचा सवाल सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते विचारत आहेत. या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला जात आहे. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास पोलीस दाखल झाले होते, सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी याबाबतचा जाब विचारला आहे.
Eknath Shinde Speech : 'लाडक्या सूनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन' मोहीम सुरू, सासरी छळ होणाऱ्यांच्या मदतीला धावणार : एकनाथ शिंदे
यापुढे राज्यात सूनांचा छळ होणार नाही. त्यांच्या रक्षणासाठी शिवसेनेने 'लाडक्या सूनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन' ही मोहीम सुरू केली आहे. ज्या ठिकाणी सूनांचा छळ होईल त्या ठिकाणी आमच्या रणरागिणी धावून जातील. शिवसेनेच्या शाखा लाडक्या सूनांसाठी हक्काचं ठिकाण असेल.
Eknath Shinde On BMC Election : यांचा जीव BMC च्या तिजोरीत
राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. सध्या मुंबईचा लढा कॅम्पेन सुरू केलं आहे. हा लढा आता आठवला, सत्तेत असताना काय केलं? लढायला घराबाहेर तर पडायला हवं. घरात बसून काही होत नाही. आता जे काही घरातून बाहेर पडत आहात त्या मागे एकनाथ शिंदे आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि कुणाचा बाप जरी आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकणार नाही.























