Maharashtra Breaking Live Updates: थोड्याच वेळात बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार, भुजबळ, मुंडेंची उपस्थिती
Maharashtra Breaking Live Updates 17 October 2025: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Breaking Live Updates 17 October 2025: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
Bihar Election : नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होणार का? अमित शाह म्हणाले, ते आमदार ठरवतील
Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
पटना येथील एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले, “मी कोणाला मुख्यमंत्री बनवणारा नाही. इतक्या पक्षांचं गठबंधन आहे. निवडणुकीनंतर आमदारांची बैठक होईल आणि तेव्हाच नेता ठरवला जाईल. सध्या मात्र आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढत आहोत, आणि तेच आमच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व करत आहेत."
10 लाखांची लाच घेताना पालिका आयुक्ताला रंगेहाथ पकडलं, ACB ची कारवाई, कंत्राटदारांनी फोडले फटाके
Jalna : जालना महानगरपालिकेचे (Jalna Mahapalika) आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर (Santosh Khandekar) हे लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. तक्रारदाराकडून कामाचे बिल पास करण्यासाठी मागितली तब्बल 10 लाख रुपयांची लाच देण्याची मागणी खांडेकर यांनी केली होती. यावेळी शासकीय निवासस्थानी 10 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ त्यांना पकडले आहे. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे. संतोष खांडेकर यांच्या घराची देखील झाडाझडती घेण्यात आली आहे.
धरणगावात अतिवृष्टी नुकसानभरपाईसाठी महाविकास आघाडीचे ‘हंबरडा’ आंदोलन
जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी आणि धरणगाव तालुक्याचा समावेश सरसकट अतिवृष्टी नुकसानभरपाई यादीत करण्यात यावा, या मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर हंबरडा आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
भाईगिरीचे रील बनविणाऱ्याला जळगाव पोलिसांनी घडवली अद्दल
जळगाव : शहरातील शाहूनगर परिसरात राहणाऱ्या इमरान भिस्ती या तरुणाने सोशल मीडियावर भाईगिरी दाखवणारा एक रील बनवून व्हायरल केला होता. संबंधित व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कारवाई करत इम्रानला घरून ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर इम्रानला खाक्या दाखवताच त्याने लगेच माफी मागणारा व्हिडिओ बनविला. इम्रान विरुद्ध प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या व्हिडिओंद्वारे समाजात भीती पसरवणाऱ्या तरुणांना इशारा देत सांगितले की, भाईगिरी दर्शवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
























