Maharashtra Breaking Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाचे अपडेट्स, पाहा एका क्लिकवर
Maharashtra Breaking Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाचे अपडेट्स, पाहा एका क्लिकवर

Background
Maharashtra Breaking Live Updates: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या सध्या चर्चा सुरु आहे. यादरम्यान ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसैनिकांचं राज्यात अनेक ठिकाणी मनोमिलन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घडामोडींसह राज्यासह देश-विदेशातील महत्वाचे अपडेट्स, पाहा एका क्लिकवर
बीड: मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली सरपंच देशमुख कुटुंबाची भेट
Anc: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. बीडच्या मसाजोग गावात प्रताप सरनाईक यांनी वैभवी देशमुख धनंजय देशमुख आणि समस्त ग्रामस्थांची ही भेट घेतली आहे. यादरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीला अभ्यासासाठी सरनाईक यांनी लॅपटॉप भेट दिला. तर पुढील शिक्षणाचा देखील खर्च सरनाईक करणार आहेत.. दरम्यान मंत्री सरनाईक यांनी देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची माहिती धनंजय देशमुख यांच्याकडून जाणून घेतली.
अहमदाबाद विमान अपघातावर जे पी नडडांची प्रतिक्रिया...
गुजरातमधील अहमदाबाद येथे घडलेल्या विमान दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे.
या दु:खद घटनेनंतर गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री श्री. @CRPaatil आणि राज्याचे आरोग्यमंत्री श्री. @irushikeshpatel यांच्याशी संपर्क साधून आरोग्य सेवा आणि मदतकार्याची माहिती घेतली आहे.
मी भाजपमधील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी तात्काळ मदत व बचाव कार्यात सहभागी व्हावे आणि पीडित कुटुंबांना शक्य तेवढी मदत करावी.
ईश्वर शोकाकुल कुटुंबियांना ही असह्य वेदना सहन करण्याची ताकद देओ आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शक्ती देवो, हीच प्रार्थना.























